Palghar News : गणपती विर्सजनासाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू, पालघरमधील धक्कादायक घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका तरूणाचा तलावात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाबाबू राजकुमार पासवान अस मृत तरुणाचं नाव आहे.
Palghar News : पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत गणपती विसर्जनासाठी गेलेल्या एका तरूणाचा तलावात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाबाबू राजकुमार पासवान अस मृत तरुणाचं नाव आहे. विसर्जना दरम्यान तलावातील पाण्याचा खोलीचा अंदान आल्याने राजाबाबूचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बोईसरच्या सरावलीमध्ये ही घटना घडली आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनु्सार, खरं तर 27 जुलैला घराघरात बाप्पांचे आगमन झाले.या आगमनानंतर दुसऱ्याच दिवशी दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.या दरम्यानच पालघरमध्ये मोठी घटना घडली आहे.पालघरमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाबाबू पासवान हा तरूण गणपती विसर्जनासाठी तलावात उतरला होता. मात्र विसर्जना दरम्यान पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू त्याचा मृत्यू झाला. या घटनेने विर्सजनस्थळी एकच खळबळ माजली होती.
advertisement
या घटनेनंतर तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपासाला सूरूवात केली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तलावात शोधमोहिम राबवली आणि तरूणाला शोधून काढलं. आता पोलिसांनी या तरूणाचा मृतदेह पोस्टमार्टम रिपोर्टसाठी पाठवला आहे. तसेच या घटनेच्या तपासाला पोलिसांनी सूरूवात केली आहे.
तीन जण वाहून गेल्याची घटना
रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमध्ये ही दुदैवी घटना घडली आहे. या घटनेत जगबुडी नदीत आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन सूरू होते.यावेळी गणपतीचे विसर्जन करण्यासाठी चार ते पाच जण पाण्यात उतरले होते. पण पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे जण वाहून गेले होते. त्यातील दोघे जण कसेबसे किनाऱ्यावर आले होते.तर एकाचा अद्याप शोध लागला नाही आहे. त्यामळे त्याचे शोध कार्य सुरू आहे. ही घटना आज साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
advertisement
दरम्यान गेल्या दोन ते तीन तासांपासून वाहून गेलेल्या गणेश भक्ताचे शोध कार्य सुरू आहे.घटनास्थळी खेड पोलीस दाखल झाले असून विसर्जन कट्टा तसेच रेस्क्यू टीम देखील दाखल झाले आहे.आणि त्या बेपत्ता व्यक्तीचा शोध सूरू आहे.त्यामुळे आता या व्यक्तीचा शोध लागतो की नाही, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view commentsLocation :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
August 30, 2025 4:03 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Palghar News : गणपती विर्सजनासाठी गेलेल्या तरूणाचा तलावात बुडून मृत्यू, पालघरमधील धक्कादायक घटना


