मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर आहे, 'हे' हिडेन प्लेस; सुट्टीच्या दिवशी करा इथं फिरण्याचा प्लॅन
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
एक दिवस सुट्टी असली की प्रत्येकाचे फिरण्याचे प्लॅनिंग सुरू होतात त्यातच तरुणाईला निसर्गरम्य पर्यटन स्थळ तर देवधर्म करणाऱ्यांना देवदर्शन करायला आवडते. यांची घालमेळ चालू असताना एक दिवसाची सुट्टी घरीच घालणारे अनेक जण बघायला मिळतात.
एक दिवस सुट्टी असली की प्रत्येकाचे फिरण्याचे प्लॅनिंग सुरू होतात त्यातच तरुणाईला निसर्गरम्य पर्यटन स्थळ तर देवधर्म करणाऱ्यांना देवदर्शन करायला आवडते. यांची घालमेळ चालू असताना एक दिवसाची सुट्टी घरीच घालणारे अनेक जण बघायला मिळतात. परंतु कल्याण स्टेशनपासून 64 किमी अंतरावर आणि मुंबईपासून फक्त 1 तासांच्या प्रवासात खोपोली जवळील पंचायतन मंदिर पनवेल तालुक्यातील नढाल येथे आहे.
पंचायतन मंदीर खोपोली शहरात नाही. हे मंदिर रायगड जिल्ह्यात असून मुंबई आणि पुण्याहून येथे सहज जाता येते. मंदिरात पाच देवतांची (गणपती, साईबाबा, शिवलिंग, मारुती आणि विठ्ठल) स्थापना करण्यात आली असून या मंदिरात प्रवेश केल्यास निसर्गरम्य वातावरण आणि शुद्ध हवा आणि पवित्रता जपलेली वास्तू इथे बघायला मिळेल. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून एक दिवसाचा विसावा घ्यायचा असेल तर या ठिकाणी नक्कीच भेट देऊ शकता. इथे चहा प्रसाद म्हणून दिला जातो. मुख्य गोष्ट म्हणजे, इथे वडापाव सुद्धा फक्त 10 रूपयाला मिळतो.
advertisement
10 रूपयामध्ये मिळणारा वडापाव एकदम चविष्ट मिळत असल्याने इथे भेट देणारे पर्यटक आणि भाविक जेवण किंवा नाश्ता बाहेरून आणत नाहीत. गाड्यांच्या पार्किंगपासून ते मंदिराच्या कोणत्याही ठिकाणी भेट द्या सर्व काही मोफत आणि हव्या तेवढ्या वेळात आपण फिरू शकतो. पहाटे 5 वाजता सुरू होणारे हे मंदिर रात्री 9 वाजता बंद केले जाते. जर तुम्हाला एक दिवस राहून दुसऱ्या दिवशी रिटर्न जायचं असेल तर निवासी सोय फ्री मध्ये आहे. तसेच अपंग व्यक्तीसाठी सायकलची सोय, पिण्याच्या पाण्याची सर्व सोयीसुविधा या ठिकाणी मोफत आहेत. यामुळे हे ठिकाण कमी खर्चात सर्वजण एन्जॉय करू शकतात. याचा फायदा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना होतो.
advertisement
त्यामुळे फॅमिली किंवा मित्रमंडळी एक दिवसाचा बाहेर जाण्याचा प्लॅनिंग करत असाल तर हे ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य आहे. त्यामुळे शिर्डी किंवा तुळजापूर, गणपतीदर्शन किंवा इतर देवस्थानी फिरण्यासाठी आपला वेळ फुकट न घालवता या ठिकाणी गेलात तर पाच देवांचे दर्शन आरामात आणि व्यवस्थित भेटून जाते. हे पाच मंदिर एकाच ठिकाणी सुटसुटीत असल्याने पर्यटकांना आकर्षित करण्याचे ठिकाण बनले आहे. त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या. कमी खर्चात पूर्ण फॅमिली एन्जॉय करू शकते.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
November 10, 2025 8:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर आहे, 'हे' हिडेन प्लेस; सुट्टीच्या दिवशी करा इथं फिरण्याचा प्लॅन

