Shani Mandir: शनी कोपला, भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवलं; शनी देवस्थानच्या चाव्या आता जिल्हाधिकाऱ्यांकडे!
- Published by:Sachin S
- Reported by:Harish Dimote
Last Updated:
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनिशिंगणापूर येथील शनीदेवाचे मंदिर प्रशासन भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आलं होतं.
अहिल्यानगर: आपल्यावर शनी देवाची वक्रदृष्टी पडू नये , देवाचा आशिर्वाद कायम असावा या धारणेने लाखो हिंदू भक्त शनी शिंगणापूर येथिल शनीदेवाच्या दर्शनाला येत असतात. पण, या शनैश्वर विश्वस्त मंडळाने भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता. अखेरीस राज्य सरकारने शनी मंदिर विश्वस्त मंडळ बरखास्त केलं. आता आता अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शनी मंदिराचा प्रभारी अध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाने बरबटलेल्या विश्वस्त मंडळाच्या ठिकाणी लवकरच नवीन विश्वस्त मंडळ नेमले जाणार असून तोपर्यंत जिल्हाधिकारी मंदिराचे कामकाज बघणार आहेत.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शनिशिंगणापूर येथील शनीदेवाचे मंदिर प्रशासन भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे चर्चेत आलं होतं. बनावट एपच्या माध्यमातून भाविकांची लूट, बेसुमार बोगस कामगार भरती, भ्रष्टाचार एक ना अनेक कारणामुळे शनी मंदिर विश्वस्त वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यामुळे एकीकडे या प्रकरणांची चौकशी सुरू असताना राज्य सरकारच्या विधी न्याय विभागाने विश्वस्त मंडळ बरखास्त करत कारवाई केली होती.
advertisement
त्यानंतर आता शनी मंदिर संस्थानचा कारभार हा जिल्हाधिकाऱ्यांकडे तात्पुरता सोपवला आहे. आज (शनिवारी) जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी शनीदेवाचे पूजन करत आपला पदभार स्विकारला आहे. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी पंकज आशिया यांना सर्वांनी सहकार्य करावे, असं आवाहन केलंय.
काय आहे प्रकरण?
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने शनी शिंगणापूर येथील प्रसिद्ध शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेतला. देवस्थान प्रशासनातील अनियमितता, भ्रष्टाचार, बनावट ॲप आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारित असलेले शनी शिंगणापूर देवस्थान राज्य सरकारने ताब्यात घेतले आहे. गेल्या काही महिन्यांपासून विश्वस्त मंडळावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे विधी न्याय विभागाने देवस्थान अधिनियम 2018 नुसार विश्वस्त मंडळ बरखास्त केली आहे. या निर्णयाचे शनी शिंगणापूर ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाच्या कारभारा विरोधात लढा देणारांनी स्वागत केलंय.
Location :
Nagardeole,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
September 27, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shani Mandir: शनी कोपला, भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवलं; शनी देवस्थानच्या चाव्या आता जिल्हाधिकाऱ्यांकडे!