निधी अडवला जात असेल तर रेकॉर्डवर घ्या आणि अजित पवारांसमोर मांडा, पंकजा मुंडेंच्या सूचना
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आमदार हे विकास कामासाठी अधिकाऱ्यांना बोलू शकतात परंतु कोणाचा निधी अडवू शकत नाहीत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या आमदारांना पंकजा मुंडेंनी इशारा दिला आहे. निधी अडवला जात असल्याचे प्रकार अजिबात सहन करणार नाही.. कोणी अडवणूक करत असेल तर रेकॉर्डवर घ्या आणि अजित पवारांपुढे मांडा, अशा सूचना पंकजा मुंडेंनी दिल्या आहेत.त्या बीडमध्ये बोलत होत्या.पंकजा मुंडे यांचनी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत.
एमआरजीएस, घरकुल, विहिरीसह इतर विकास कामांमध्ये निधी अडवला जात असल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे. काही तालुक्यांमध्ये असे प्रकार होत आहेत. परंतु असा अधिकार आमदारांना नाही. आमदार हे विकास कामासाठी अधिकाऱ्यांना बोलू शकतात परंतु कोणाचा निधी अडवू शकत नाहीत. भलेही तो तुमचा मतदार असेल अथवा नसेल, असा प्रकार कोणी करत असेल तर त्याचे म्हणणे रेकॉर्डवर घ्या आणि ते अजित पवारांपुढे मांडा असे म्हणत पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील आमदारांना इशारा दिलाय.
advertisement
रेकॉर्डवर घ्या आणि अजित पवारांसमोर मांडा : पंकजा मुंडे
पंकजा मुंडे म्हणाल्या, कोणीही आमदार असो... मला विचारल्या शिवाय बिले काढायची नाहीत, मला विचारल्या शिवाय रोजगार हमीचे पैसे द्याचे नाहीत असे कोणी म्हणत असेल तर ते रेकॉर्डवर घ्या आणि अजित पवारांसमोर मांडा. कारण, आमची भूमिका आडवा-आडवीची नाही. आम्ही काही घडवण्याच्या भूमिकेत आहोत. काही कमी पडलं तर चार गोष्टी मदत करुन उभ्या करु. विहिरीचे पैसे सुद्धा कोणी देत नसेल.. अशा तक्रारी माझ्याकडे आल्या तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. असे कोणी अधिकारी किंवा इतर कोणी करत असेल तर ऑन रेकॉर्ड घ्या आणि ते पालकमंत्र्यांना दाखवा.
advertisement
पंकजा मुंडेंचा नेमका इशारा कोणाला?
बीडच्या परळी येथे घरकुला संदर्भात आयोजित कार्यशाळेत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.. यावेळी व्यासपीठावर आमदार धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन व मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांची उपस्थिती होती. आता अशा पद्धतीने कामे नेमकी कोणी अडवली आणि पंकजा मुंडे यांनी हा इशारा कोणाला दिला याची चर्चा होऊ लागली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 06, 2025 9:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
निधी अडवला जात असेल तर रेकॉर्डवर घ्या आणि अजित पवारांसमोर मांडा, पंकजा मुंडेंच्या सूचना