3 महिने टॉर्चर, काल जोरदार भांडण, पतीच्या डोळ्यादेखत.., पंकजा मुंडेच्या पीएच्या पत्नीसोबत शेवटच्या क्षणी काय घडलं?

Last Updated:

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या डॉक्टर पत्नीने राहत्या घरात आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

News18
News18
मुंबई: भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरात आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नीचं नाव गौरी असून त्या डॉक्टर होत्या. ८ ते ९ महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. पण अवघ्या ९ महिन्यातच त्यांचा संसार मोडला आहे.
गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्यानंतर गौरी यांच्या मामाने खळबळजनक आरोप केले आहेत. गौरीला मागील तीन महिन्यांपासून टॉर्चर केलं जात होतं, असा दावा मामांनी केला आहे. तसेच काल दुपारी एक वाजल्यापासून गौरी आणि अनंत गर्जे यांच्यात जोरदार भांडण सुरू होतं. ज्यावेळी गौरी यांनी आत्महत्या केली, तेव्हा अनंत गर्जे घरातच होते. त्यांच्या डोळ्यादेखत गौरीने जीवन संपवल्याची माहिती मामांनी दिली आहे.
advertisement
या सगळ्या प्रकरणावर भाष्य करताना गौरी यांच्या मामांनी सांगितलं की, काल एक वाजल्यापासून भांडणं सुरू होती. ज्यावेळी तरुणीने आत्महत्या केली. त्यावेळी अनंत गर्जे स्वत: घरी होता. यानंतर तो स्वत: मृतदेह घेऊन रुग्णालयात आला. हॉस्पिटलमधून तो गेला. दोन तीन महिन्यांपासून गर्जे मुलीला टॉर्चर करत होता. त्याचे काही वैयक्तिक काही संबंध मुलीला समजली होती. तरीही त्याला माफ केलं होतं. पण त्यांचं व्हॉट्सअॅपवर चॅटींग सुरू होती. हे सगळे पुरावे मुलीच्या वडिलांकडे आहेत. आमच्या मुलीला न्याय द्यावा."
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पती अनंत गर्जे आणि गौरी यांचं फेब्रुवारी महिन्यात लग्न झालं होतं. या लग्नाला भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि भाजप आमदार नमिता मुंदडा देखील उपस्थित होत्या. मोठ्या धुमधडक्यात हा विवाह सोहळा पार पडला होता. लग्नाच्या काही दिवसातंच अनंत गर्जे यांचं बाहेर अफेअर सुरू असल्याची माहिती गौरीला समजली होती, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement
कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, तरुणीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना पाठवले होते या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. ही आत्महत्या आहे की त्यामागे इतर कोणता संशयास्पद प्रकार आहे? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मृतदेहाची पोस्टमॉर्टेमसाठी पाठवणी करण्यात आली आहे कुटुंबीयांचे जबाब नोंदवून, मोबाईल चॅट, कॉल रेकॉर्ड व इतर तांत्रिक पुरावा तपासात घेतले जात आहेत. वरळी पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
3 महिने टॉर्चर, काल जोरदार भांडण, पतीच्या डोळ्यादेखत.., पंकजा मुंडेच्या पीएच्या पत्नीसोबत शेवटच्या क्षणी काय घडलं?
Next Article
advertisement
Ajit Pawar ZP Elections Date :  ''मला सांगितलंय की....'', जिल्हा परिषद निवडणूक तारखांबाबत अजितदादांच मोठं वक्तव्य
'मला सांगितलंय की..', जिल्हा परिषद निवडणुकांबाबत अजितदादांच मोठं वक्तव्य
  • ''मला सांगितलंय की....'', जिल्हा परिषद निवडणूक तारखांबाबत अजितदादांच मोठं वक्तव

  • ''मला सांगितलंय की....'', जिल्हा परिषद निवडणूक तारखांबाबत अजितदादांच मोठं वक्तव

  • ''मला सांगितलंय की....'', जिल्हा परिषद निवडणूक तारखांबाबत अजितदादांच मोठं वक्तव

View All
advertisement