पोरी गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरीला निरोप देताना वडील हुंदक्यांनी दाटले; धायमोकलून रडले
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Gauri Palve Video: गौरीच्या अंत्यसंस्कारावेळी वडिलांचा स्मशानभूमीतील आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता.
अहिल्यानगर : डॉक्टर गौरी पालवे हिची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. गौरीवर अनंत गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करणार असल्याचा पवित्रा पालवे कुटुंबीयांनी घेतलाय. यामुळं पालवे आणि गर्जे कुटुंबीयांमध्ये चांगलाच वाद पेटलाय. घरासमोर अंत्यविधी करण्यास वादावादी झाली. पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर नातेवाईकांकडून अंत्यविधीची जागा बदलण्यात आली. मात्र या वेळी गौरीच्या वडिलांचा स्मशानभूमीतील आक्रोश हा काळीज पिळवटून टाकणारा होता.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं. मात्र, अनंत गर्जे याच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये सातत्याने भांडणं व्हायची. याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मात्र गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
advertisement
गौरीच्या वडिलांनी टाहो फोडला (Gauri Palve Father)
कुटुंबीयांच्या आरोपानंतर वरळी पोलिसांनी गौरीचा पती अनंत गर्जेला अटक केली आहे. तर अनंत गर्जेची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी गर्जेवर कठोर कारवाई करण्यासाठी गौरीच्या नातेवाईकांनी प्रचंड गोंधळ घातला. या वेळी वडिलांचा आक्रोश हा काळजाचं पाणी करणारा होता. गौरीच्या वडिलांनी स्मशनात टाहो फोडला. मुली श्रीमंताच्या घरी देऊ नका... भपक्यावर जाऊ नका... गरीबाला मुली द्या, मला आणि माझ्या मुलीला न्याय द्या... असे म्हणत गौरीच्या वडिलांनी टाहो फोडला आहे.
advertisement
पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित (Anant Garje Pankaja Munde PA)
मृत्यूच्या आधी काही दिवस तिच्या हाती पतविरोधात महत्वाचा पुरावा लागाल होता. पत्नी गौरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले, गौरीचे आई वडील आक्रमक झाले होते. तिचे पती अनंत गर्जे यांच्या घरासमोर मोहज देवडे या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. अनंत गर्जे प्रकरणात पंकजा मुंडेंवर अंजली दमानियांनी प्रश्न उपस्थित केलेत. ट्विट करून त्यांनी पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलाय. पंकजा मुंडे यांचे कालचे स्टेटमेंट वाचून धक्का बसला. पीए अनंतनं पत्नीने आत्महत्या केल्याचं अत्यंत आक्रोशानं तुम्हाला सांगितलं, तर तुम्ही पुढे काय केलं? तुम्ही घटनास्थळी का गेला नाहीत, तुम्हाला जमत नव्हते, तर तुमच्या कार्यालयाकडून कुणी उपस्थित का नव्हतं? तुमच्या कार्यालयानं हे पोलिसांना कळवलं का? पुत्रसमान पीएला तत्काळ मदतीला का गेला नाहीत? असा सवाल उपस्थित केला आहे.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
November 24, 2025 12:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरी गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका, गौरीला निरोप देताना वडील हुंदक्यांनी दाटले; धायमोकलून रडले


