advertisement

City Bus: पनवेलकरांच्या सेवेत येणार खास बस, महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय

Last Updated:

City Bus: पनवेलमधील वाढती लोकसंख्या पाहता अनेक दिवसांपासून स्वतंत्र बससेवेची मागणी वाढली आहे.

City Bus: पनवेलकरांच्या सेवेत येणार खास बस, महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय
City Bus: पनवेलकरांच्या सेवेत येणार खास बस, महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय
पनवेल: झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि परिसराचा वेगाने होत असलेला विकास लक्षात घेता, पनवेल महानगरपालिकेने स्वतःची बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी प्रथम टप्प्यात एका तज्ज्ञ एजन्सीमार्फत सर्वेक्षण केलं जाणार आहे. या एजन्सीच्या अहवालाच्या आधारावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नवीन पनवेल, खारघर, तळोजा, कामोठे, कळंबोली, नावडे, करंजाडे, उळवे या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली आहे. याशिवाय, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेल्यांसाठी पुष्पक नगर आणि नैना क्षेत्रातील नेरे, पळसपे, पोयंजे येथेही विकास सुरू आहे. सध्या या भागात नवी मुंबई महापालिका (एनएमएमटी), बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बससेवा कार्यरत आहेत. मात्र, वाढती लोकसंख्या आणि प्रवासाची गरज पाहता स्वतंत्र बससेवेची मागणी वाढली आहे.
advertisement
पनवेल महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने या प्रस्तावासाठी नामांकित आणि अनुभवी एजन्सीची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही एजन्सी प्रवासी संख्येचा अंदाज, बससेवा फायदेशीर राहील का आणि बस मार्गांची उपयुक्तता यासह विविध बाबींचा सविस्तर अभ्यास करेल. अहवालात सादर केलेल्या तांत्रिक व आर्थिक बाबींचा अभ्यास करून पुढील धोरण ठरवलं जाईल.
advertisement
पनवेल महानगरपालिका परिवहन विभागाचे उपायुक्त अभिषेक पराडकर म्हणाले, "या प्रस्तावामुळे पनवेलकरांना लवकरच स्वस्त, सुलभ आणि रिंग रोडच्या माध्यमातून अंतर्गत प्रवासासाठी दर्जेदार बससेवा मिळू शकते. मनपाची स्वतंत्र सेवा सुरू करावी की, एनएमएमटी सोबत भागीदारीत बस चालवावी याबाबतचा निर्णय सर्वेक्षण अहवालानंतर घेतला जाणार आहे."
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
City Bus: पनवेलकरांच्या सेवेत येणार खास बस, महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement