Konkan Railway: एका क्लिकवर मिळणार कोकण रेल्वेची A टू Z माहिती, प्रवाशांसाठी 'केआर मिरर' लाँच
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Konkan Railway: दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वेच्या सेवेचा लाभ घेतात. प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने आपली सेवा अपग्रेड केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील रेल्वे वाहतुकीमध्ये कोकण रेल्वेचा सिंहाचा वाटा आहे. दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वे सेवेचा लाभ घेतात. आपल्या प्रवाशांसाठी कोकण रेल्वेने आपली सेवा देखील अपग्रेड केली आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 'केआर मिरर' हे नवे मोबाईल ॲप लाँच केलं आहे. हे मोबाईल ॲप प्रवाशांना आधुनिक आणि सर्वसमावेशक डिजिटल अनुभव देणारं आहे. विशेष म्हणजे, दृष्टिदोष, हालचालीतील अडचणी किंवा संज्ञानात्मक अडचणी असलेल्या प्रवाशांचा देखील हे ॲप डिझाईन करताना विचार केला गेला आहे.
नवीन ॲपमुळे प्रवाशांना तत्काळ आवश्यक माहिती मिळेल आणि सुरक्षाविषयक जागरूकता देखील वाढेल. स्थानिक भाषांमध्ये माहिती उपलब्ध होत असल्याने प्रवासाचं नियोजन अधिक सोपं आणि सोयीचं ठरेल. पर्यटन व स्थानिक ठिकाणांविषयी मार्गदर्शन देखील मिळणार आहे. मोठ्या अक्षरांचा पर्याय, हाय कॉन्ट्रास्ट थीम आणि सोपं नेव्हिगेशन यामुळे सर्व वयोगटातील व विविध क्षमतेच्या प्रवाशांसाठी हे ॲप उपयुक्त ठरेल, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.
advertisement
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, नवीन ॲपमुळे प्रवाशांना आता ट्रेनचे रिअल टाईम रनिंग स्टेटस, वेळापत्रक तसेच स्टेशनवरील सुविधा, खानपान सेवा यांची माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे. महिलांसाठी स्वतंत्र सुविधा, सुरक्षाविषयक फिचर्स आणि हेल्पलाईन्ससुद्धा यात देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटक व चित्रपट चित्रीकरणासाठी प्रसिद्ध स्थळांची माहिती, फोटोंसह तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. हेल्प डेस्कमार्फत थेट तक्रारी नोंदवणे, चौकशी करणे सुलभ झालं आहे. याशिवाय, कोकण रेल्वेचा इतिहास, टप्पे आणि यशोगाथाही प्रवाशांना या ॲपमध्ये पाहायला मिळतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 11:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Konkan Railway: एका क्लिकवर मिळणार कोकण रेल्वेची A टू Z माहिती, प्रवाशांसाठी 'केआर मिरर' लाँच