Railway Luggage: रेल्वेत जास्त सामना नेल्यास भरावा लागणार दीडपट दंड! काय आहेत नवीन नियम

Last Updated:

Railway Luggage: सर्व रेल्वे स्टेशनवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Railway Luggage: रेल्वेत जास्त सामना नेल्यास भरावा लागणार दीडपट दंड! काय आहेत नवीन नियम
Railway Luggage: रेल्वेत जास्त सामना नेल्यास भरावा लागणार दीडपट दंड! काय आहेत नवीन नियम
पुणे: रेल्वेकडून एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. आता रेल्वे प्रवास करताना सामान घेऊन जाण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. रेल्वेतही विमानप्रवासाप्रमाणे सामानाचं वजन तपासलं जाणार आहे. प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यापूर्वी त्यांचं सामान वजन काट्यावर तपासलं जाईल. ठरवलेल्या नियमांपेक्षा जास्त वजन असल्यास त्यावर दीडपट शुल्क आकारलं जाणार आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी नवे नियम, सामानाची वजन तपासणी अनिवार्य
रेल्वे मंत्रालयाच्या माहिती व प्रसिद्धी विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, आता प्रवाशांना रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यापूर्वी आपल्या सामानाचं वजन करावं लागणार आहे. यासाठी सर्व स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक वजनकाटे बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जर बॅग ठरवलेल्या वजनापेक्षा जड असेल, तर प्रवाशांना दंड भरावा लागणार आहे.
advertisement
सुरुवात यूपीपासून, नंतर देशभरात लागू
प्रवासात घेऊन जाणाऱ्या सामानासंदर्भात पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील प्रयागराज, मिर्झापूर, कानपूर, अलीगड येथे हा नियम लागू करण्यात येणार आहे. हा नियम आधीही रेल्वेने ठरवून दिलाच होता. पण, आता त्याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं जाणार आहे. यानंतर संपूर्ण देशभरात हा नियम अंमलात येणार आहे.
advertisement
5 ते 12 वयोगटातील मुलांनाही नियम लागू
5 ते 12 वयोगटातील मुलांनाही सामानाच्या वजनाचा नियम लागू होणार आहे. मात्र, या वयोगटातील मुलांना फक्त अर्ध्या रकमेच्या मर्यादेतच सामान वाहून नेण्याची परवानगी दिली जाईल. म्हणजेच ते प्रौढ प्रवाशांइतके वजन नेऊ शकणार नाहीत. याशिवाय, कोणत्याही प्रवाशाचं सामान 50 किलोपेक्षा जास्त वजनाचं असल्यास ते घेऊन जाण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
advertisement
रेल्वे मंडळाकडून लगेजसंदर्भात नवीन नियम जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, मध्य रेल्वे विभागात या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी अद्याप परिपत्रक आलेलं नाही. परिपत्रक आल्यानंतरच या नियमांची ठोस अंमलबजावणी सुरु होणार असल्याचं  रेल्वे जनसंपर्क अधिकारी (मध्य रेल्वे पुणे) हेमंत कुमार बेहेरा यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Railway Luggage: रेल्वेत जास्त सामना नेल्यास भरावा लागणार दीडपट दंड! काय आहेत नवीन नियम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement