आई-बाबा मला शोधू नका, मोबाईल बंद पण इन्टाग्रामने दिला पत्ता, छत्रपती संभाजीनगरच्या तरुणीचं धक्कादायक पाऊल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शॉर्टहँड क्लाससाठी बाहेर पडलेली 22 वर्षांची तरुणी योगेशसोबत कोर्ट मॅरेज करून निघून गेली. इन्स्टाग्रामवरून पोलिसांनी शोध लावला आणि तिच्या सुरक्षिततेची खात्री केली.
क्लाससाठी म्हणून घराबाहेर पडलेली तरुणी क्लासनंतर घरी परतलीच नाही. अखेर आई वडिलांचा धीर सुटला आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं. मुलीचा फोन बंद येत होता. मैत्रिणींकडे चौकशी केली मात्र त्यांनाही काहीही माहिती नव्हती. अखेर पोलीस ठाण्यात आई वडिलांना मुलीला शोधण्याची विनंती केली, मिसिंगची तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध सुरू केला. मोबाईल बंद मात्र तरीही त्यांना तरुणीचा पत्ता सापडला. तोही इन्स्टाग्रामवरुन, पोलिसांनी या तरुणीला शोधलं मात्र त्यानंतर जे समोर आलं त्याने आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.
22 वर्षांची तरुणी शॉर्ट हॅण्डच्या क्लाससाठी घराबाहेर पडली. नेहमीप्रमाणे आईकडून डबा घेतला आणि घर सोडलं. मात्र आज तिचा घरातला शेवटचा दिवस होता. ती पुन्हा घरी येणार नाही याची कुणालाच कल्पना नव्हती. आई वडिलांना वाटलं तरुणी सरकारी नोकरीसाठी क्लास करते. मात्र तिचं मन क्लासपेक्षा जास्त 28 वर्षीय तरुणावर जडलं होतं. पदवी शिक्षण पूर्ण करून 'शॉर्टहँड'चे धडे गिरवणाऱ्या तरुणीनं आयुष्याचा मोठा निर्णय घेतला.
advertisement
क्लास संपला आणि त्यानंतर घडलं...
क्लासला जाऊन, मैत्रिणींसोबत हसून-खेळून तिने तो वेळ घालवला, कोणालाच संशय येऊ दिला नाही. त्यानंतर मैत्रिणींना तिने शेवटचं टाटा केलं आणि त्यानंतर 28 वर्षीय तरुणासोबत ती निघून गेली. तिने त्याच्यासोबत कोर्ट मॅरेज केलं आणि त्यानंतर नव्या प्रवासाची सुरुवात केली. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात 'मिसिंग'ची तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी तरुणीचा शोध सुरू केला. तिचा मोबाईल बंद होता, त्यामुळे तपास यंत्रणेसाठी हे मोठे आव्हान होतं.
advertisement
पोलिसांनी असा लावला शोध
मोबाईल बंद झाल्याने पोलिसांनी टेक्नोलॉजीची मदत घेतली. तांत्रिक तपासानंतर पोलिसांनी तरुणाच्या इन्स्टाग्राम आयडीचा शोध घेतला आणि त्यांच्या तपासाला दिशा मिळाली. पोलिसांनी थेट तरुणाशी इन्स्टाग्रामवरून संपर्क साधला. काही वेळातच तरुणाने पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर त्यांच्या लग्नाचे 'रजिस्टर्ड मॅरेज सर्टिफिकेट' पाठवले आणि आपण व्यवसाय करत असल्याची माहिती देखील दिली. यानंतर पोलिसांनी थेट तरुणीशी बोलायचं असल्याचं सांगितलं.
advertisement
आई-बाबा, रागवू नका, मी सुखात आहे...
पोलिसांनी तरुणीशी संपर्क साधला आणि तिच्या आई वडिलांशी फोनवर बोलणं करुन दिलं. आई पूर्ण खचली होती, रडत होती, वडिलही खचले, पण तरुणीने धीरगंभीरपणे आणि संयम ठेवून शांतपणे आईशी बोलली. ती म्हणाली, "आई-बाबा, रागवू नका. मी योगेशसोबत लग्न केलंय. मी खूप सुखात आहे. मला परत यायची अजिबात इच्छा नाही. कृपया माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका." एका सुशिक्षित, २२ वर्षांच्या मुलीने कायद्याच्या चौकटीत राहून, स्वतःच्या आयुष्याचा घेतलेला हा धाडसी निर्णय होता. आई वडिलांना तिने घेतलेल्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला होता.
advertisement
22 वर्षांची तरुणी आणि 28 वर्षीय तरुणीने नोंदणीकृत विवाह केला होता आणि दोघांची कायद्याने सहमती होती. त्यामुळे पोलिसांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले. एका बाजूला मुलीच्या निर्णयाने दुखावलेल्या पालकांची समजूत घालण्यात आली. दोघांच्या सुखी संसाराची अधिकृत सुरुवात झाली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 8:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आई-बाबा मला शोधू नका, मोबाईल बंद पण इन्टाग्रामने दिला पत्ता, छत्रपती संभाजीनगरच्या तरुणीचं धक्कादायक पाऊल









