सावरायला 1 सेकंदही मिळाला नाही, क्षणात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, झेंड्याला सलामी दिली अन्...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर उमरगा तालुक्यातील तलमोड इथं एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना धाराशिव जिल्ह्यातून एक अतिशय वेदनादायी घटना समोर आली आहे. उमरगा तालुक्यातील तलमोड इथं एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजाला सलामी दिल्यानंतर हा अनर्थ घडला आहे. मोहन भीमा जाधव असं मृत पावलेल्या ५५ वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर काही वेळातच ही घटना घडली असून, त्यांच्या मृत्यूचा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
झेंडावंदनानंतर 'फोटो सेशन' करताना घडला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन जाधव हे तलमोड येथील चेक पोस्टवर एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी चेक पोस्टवर ध्वजारोहण केले आणि तिरंग्याला सन्मानाने सलामी दिली. कार्यक्रम पार पडल्यानंतर उपस्थितांसोबत फोटो काढत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. काही समजण्याच्या आतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते सर्वांसमोर जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी नेण्यात आले, परंतु त्यांची प्राणज्योत आधीच मालवली होती.
advertisement
नुकतंच मिळालं होतं प्रमोशन
मोहन जाधव हे मूळचे सोलापूर येथील रहिवासी होते. कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची विभागात ओळख होती. त्यांना नुकतेच प्रमोशन मिळालं होतं, त्यामुळे त्यांच्या कुटुंबात आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण होते. मात्र, पदोन्नतीचा आणि राष्ट्रीय उत्सवाचा हा आनंद नियतीने हिरावून नेला. २६ जानेवारी २०२६ रोजी त्यांनी राष्ट्रध्वजाला दिलेली ही सलामी त्यांची अखेरची सलामी ठरली.
advertisement
या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्या व्हिडीओमध्ये मोहन जाधव हे आपल्या काही सहकाऱ्यासोबत फोटो काढण्यासाठी उभे असल्याचं दिसत आहे. यावेळी फोटोसेशन सुरू असताना एका सेकंदाच्या आत ते जमीनीवर धडकन कोसळले. त्यांना स्वत:ला सावरायला एक सेकंदही मिळाला नाही. क्षणात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 2:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सावरायला 1 सेकंदही मिळाला नाही, क्षणात पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू, झेंड्याला सलामी दिली अन्...






