अजितदादांना शेजाऱ्याचा धक्का, विश्वासू सहकारी साथ सोडणार, इंदापुरात धमाका

Last Updated:

इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसंदर्भात प्रदीप गारटकर प्रचंड आशावादी होते. परंतु पक्षाने संधी नाकारल्याने गारटकर यांनी टोकाचा निर्णय घेत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केले आहे.

प्रदीप गारटकर-अजित पवार
प्रदीप गारटकर-अजित पवार
पुणे : इंदापूर नगराध्यक्षपदावरून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले आहेत. पुणे ग्रामीण राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाकडे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली होती. परंतु पक्षाने नकार दिल्यानंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी सकाळी ते राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा आणि पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहे. त्यांच्या निर्णयाने अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
राज्यात नगर पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. इंदापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसंदर्भात प्रदीप गारटकर प्रचंड आशावादी होते. परंतु राष्ट्रवादी भरतशेठ शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने गारटकर यांनी टोकाचा निर्णय घेत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचे जाहीर केले आहे.

अल्टिमेटमनंतरही राष्ट्रवादीने ठेंगा दाखवला

पक्ष जर आम्हाला कोलणार असेल तर आम्हीही पक्षाला कोलू, असे विधान प्रदीप गारटकर यांनी केले होते. आपल्या वक्तव्यानंतर पक्ष संधी देईल, अशी आशा त्यांना होती. मात्र त्यांच्या वक्तव्यानंतरही पक्षाने भरतशेठ शहा यांना उमेदवारी दिल्याने गारटकर यांनी मनगटावरील घड्याळ उतरवण्याचे ठरवले आहे. सोमवारी गारटकर नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत.
advertisement

राजीनामा देऊन नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार

पक्ष मला संधी देईल, असे मला वाटत होते. परंतु पक्षाने ज्यांचा प्रवेशही झाला नाही, अशांना संधी देण्याचे ठरवले आहे. कार्यकर्त्यांसाठी लढणाऱ्या व्यक्तीला पक्षाने डावलले आहे. पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याचे गारटकर यांनी सांगितले.

अजित पवार यांना मोठा धक्का

प्रदीप गारटकर यांची ओळख अजित पवार यांचे अतिशय विश्वासू सहकारी अशी आहे. पुणे ग्रामीणचा भार प्रदीप गारटकर यांच्या खांद्यावर आहे. अजित पवार यांच्या गृह जिल्ह्यातील अनुपस्थितीत गारटकर हे संपूर्ण जबाबदारी सांभाळतात. मात्र तेच राष्ट्रवादीशी फारकत घेत असल्याने अजित पवार यांना निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजितदादांना शेजाऱ्याचा धक्का, विश्वासू सहकारी साथ सोडणार, इंदापुरात धमाका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement