पोरीच्या धाडसाला दाद देतो, दलित तरुणाच्या मृतदेहाशी लग्न करणाऱ्या करणाऱ्या आंचलवर प्रकाश आंबेडकर म्हणाले...

Last Updated:

नांदेडमध्ये सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबियांचा जातीमुळे ह्या प्रेम प्रकरणाला विरोध होता म्हणून जातीय द्वेषाने या तरुणाची हत्या करण्यात आली.

प्रकाश आंबेडकर-सक्षम ताटे
प्रकाश आंबेडकर-सक्षम ताटे
नांदेड : नांदेडच्या इतवारा परिसरात सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. सक्षमच्या जातीमुळे मुलीच्या कुटुंबियांचा प्रेम प्रकरणाला आणि त्यांच्या लग्नाला विरोध होता. जातीय विद्वेषातून सक्षम ताटे याची हत्या करण्यात आली होती. प्रियकर सक्षमच्या हत्येनंतर आंचल मामीडवार हिने त्याच्या मृतदेहासोबत लग्न करून आपले प्रेम व्यक्त केले. आंचलच्या याच धाडसाचे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कौतुक केले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

नांदेडमध्ये सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेम प्रकरणातून अमानुषपणे हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबियांचा जातीमुळे ह्या प्रेम प्रकरणाला विरोध होता म्हणून जातीय द्वेषाने या तरुणाची हत्या करण्यात आली. अत्यंत क्रूरपणे हे सर्व घडवण्यात आले.
या प्रकरणी मुलीने घेतलेल्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. सक्षम ताटे या तरुणाच्या हत्येनंतर तरुणीने त्याच्या मृतदेहाशी विवाह करत असल्याची घोषणा केली आणि आरोपी कुटुंबियांना अटक करण्याची मागणी केली. आम्ही तरुणीच्या या धाडसाचे दाद देतो. आम्ही खंबीरपणे पीडित कुटुंबीय आणि तरुणीच्या सोबत उभे आहोत,असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
advertisement
advertisement

पोलिसांनी सक्षमविरोधात माझ्या भावाला भडकवले, आंचलचा आरोप

सक्षम ताटे याचे आंचलशी तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, जात वेगळी असल्यामुळे आंचलच्या कुटुंबीयांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आचलचे वडील गजानन मामीडवार, भाऊ साहिल मामीडवार आणि हिमेश मामीडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशीचे तुकडे डोक्यात घालून त्याचा खून केला. गुरुवारी हे सगळे प्रकरण समोर आले. पोलिसांनी सक्षमविरोधात माझ्या भावाला भडकवले, असा आरोप आंचलने केला आहे.
advertisement

 त्या मुलाला तुम्ही मारून का टाकत नाही? पोलीसच भावाला बोलला

ज्या दिवशी सक्षमची हत्या झाली, त्या दिवशी माझा भाऊ सकाळी त्याच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी मला पोलिस ठाण्यात घेऊन गेला होता. मी कोणताही गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. पोलिसांनी माझ्या भावाला सांगितले की खोटे गुन्हे दाखल करण्याऐवजी, आणि आमच्याकडे येण्यापेक्षा त्या मुलाला तुम्ही मारून का टाकत नाही? माझ्या भावाने ते पोलिसांचे म्हणणे मनावर घेतले. त्याला मारूनच तुमच्याकडे येतो, तोवर तोंड दाखवणार नाही, असे म्हणून तो पोलीस स्टेशनमधून निघाला. त्याने सक्षमवर नजर ठेवून त्याची हत्या केली..." असे आंचलने सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पोरीच्या धाडसाला दाद देतो, दलित तरुणाच्या मृतदेहाशी लग्न करणाऱ्या करणाऱ्या आंचलवर प्रकाश आंबेडकर म्हणाले...
Next Article
advertisement
BMC Shiv Sena UBT: बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब्रँड शिलेदार
बहुमत तुमचं, पण सभागृह आमचं! भाजप-शिंदेंना घाम फोडण्यासाठी ठाकरेंनी निवडला फायरब
  • राजकीय संघर्षाचे केंद्र महापालिका सभागृहाकडे सरकले आहे.

  • ठाकरे गटाने विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली असल्याचे चित्र आहे.

  • ठाकरे गटाच्या नगरसेवकांच्या गटनेते पदी आक्रमक चेहरा देण्यात आला आहे.

View All
advertisement