Indrajit Sawant Prashant Koratkar : छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य, प्रशांत कोरटकरांना कोणत्या क्षणी अटक? नागपुरात घडामोडींना वेग
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नागपूर येथील डॉ. प्रशांत कोरटकर अडचणीत सापडले आहेत. कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, नागपूरमध्येही घडामोडींना वेग आला आहे. प्रशांत कोरटकरांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
नागपूर: इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी नागपूर येथील डॉ. प्रशांत कोरटकर अडचणीत सापडले आहेत. कोल्हापूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर, नागपूरमध्येही घडामोडींना वेग आला आहे. प्रशांत कोरटकरांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना ब्राह्मण समाजाला का लक्ष्य करत आहे असा जाब विचारणारा फोन कोरटकर यांनी केला होता. त्या दरम्यान कोरटकर यांनी काही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत काही आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्याचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी इंद्रजित सावंत यांनी कोल्हापूरमध्ये पोलीस तक्रार करत ऑडिओ क्लिप आणि फोन आल्याचे पुरावे सादर केले. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरांविरोधात अजामीनपात्र कलमातंर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
advertisement
कोल्हापूर पोलीस नागपुरात दाखल...
कोरटकरांविरोधात कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरकडे रात्रीच रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत कोरटकर यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कोल्हापूर पोलिसांच्या पथकात उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आहेत. कोरटकर यांच्या निवासस्थानी जाऊन कोल्हापूर पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी कोल्हापुरात त्यांना ने्ले जाणार असून तिथे त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते.
advertisement
कोरटकरांच्या घराबाहेर घोषणाबाजी, पोलिसांचा बंदोबस्त...
प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर मराठा समाजाचे कार्यकर्ते आज सकाळी एकत्र झाले. हातात काळे झेंडे घेऊन कोरटकर विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मंगळवारी सकाळी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर कोरटकरांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. कोरटकरांना पोलीस बंदोबस्तही पुरवण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत सावंत यांना शिवीगाळ केली होती. ‘तुला घरात येऊन मारेल, हा फायनल कॉल आहे’ असं म्हणत सावंत यांना धमकी दिली होती. एवढंच नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्याबद्दल कोरटकर याने अत्यंत खालच्या शब्दांत भाष्य केलं होतं. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
दरम्यान, ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरांनी AI च्या मदतीने आपल्या आवाजाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. आपण कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्टीकरण कोरटकरांनी दिले होते.
इतर संबंधित बातमी:
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
February 26, 2025 10:48 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Indrajit Sawant Prashant Koratkar : छत्रपती शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य, प्रशांत कोरटकरांना कोणत्या क्षणी अटक? नागपुरात घडामोडींना वेग