Chandra Grahan 2025: बाप्पा गेल्यानंतर लागणार चंद्रग्रहण, या महिलांना घ्यावी लागणार काळजी, असं का घडू शकतं?
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Chandra Grahan 2025: धार्मिक दृष्टिकोनातून ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहणाचा आपल्या जीवनावर परिणाम होतो.
मुंबई : सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासारख्या खगोलीय घडामोडी नेहमीच आपल्या मनात आकर्षण आणि कुतूहल निर्माण करतात. संपूर्ण विश्वावर त्यांचा परिणाम दिसून येतो. येत्या 7 सप्टेंबर 2025 रोजी खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या चंद्रग्रहणाचा आपल्या जीवनावर परिणाम होतो. चंद्रग्रहणापूर्वी सुतक काळात विशेष काळजी घेण्याची गरज असते. विशेष करून गरोदर स्त्रिया, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि लहान मुलांनी ग्रहणकाळात नियमांचं पालन करणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. या संदर्भात मुंबईतील आदित्य जोशी गुरुजींनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
चंद्र ग्रहणाची वेळ
चंद्रग्रहण 7 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी पहाटे 1 वाजून 26 मिनिटांनी संपेल. पूर्ण चंद्रग्रहणाचा टप्पा रात्री 11 वाजून 42 मिनिटे ते 12 वाजून 47 मिनिटांच्यादरम्यान असेल. या वेळेत चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या छायेत झाकला जाईल व लालसर रंगाचा दिसेल.
advertisement
गरोदर स्त्रियांसाठी ग्रहण काळातील नियम
1) गरोदर स्त्रियांनी ग्रहणकाळात घराबाहेर पडणे टाळावे. या काळात नकारात्मक उर्जेचा गर्भावर परिणाम होतो, असं मानलं जातं.
2) धारदार वस्तू (सुई, सुरी, कात्री) वापरू नयेत.
3) ग्रहणकाळात मलमूत्र विसर्जन टाळावे, कारण परंपरेनुसार हा काळ अशुद्ध मानला जातो.
4) ग्रहण सुरू असताना काहीही खाणे-पिणे टाळावे. देवाचं नामस्मरण, मंत्रजाप, शांत ध्यान करणे लाभदायी असते.
advertisement
लहान मुलं, वृद्ध व आजारी व्यक्तींसाठी ग्रहणकाळातील नियम
1) लहान मुलांनी ग्रहणकाळात घराबाहेर पडू नये.
2) वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी या काळात विश्रांती घ्यावी. परंतु, झोपी जाऊ नये.
3) खाणे-पिणे किंवा मलमूत्र विसर्जन टाळावे.
4) ग्रहण संपल्यानंतर स्नान करूनच अन्नग्रहण करावे, यामुळे शुद्धता राखली जाते.
शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार, जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत एकत्र येतात तेव्हा तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. धार्मिक दृष्टिकोनातून मात्र, ग्रहणाची घटना शुभ मानली जात नाही. त्यामुळे असं मानलं जातं की, ग्रहणाच्या वेळी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर या ग्रहणाचा कुटुंबाच्या आणि व्यक्तीच्या जीवनावर वाईट परिणाम होत नाही. पण, महत्त्वाच्या गोष्टी लक्षात न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम होतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Chandra Grahan 2025: बाप्पा गेल्यानंतर लागणार चंद्रग्रहण, या महिलांना घ्यावी लागणार काळजी, असं का घडू शकतं?

