advertisement

पुण्यात हातगाडीच्या वादातून रक्तरंजित हल्ला, हॉटेल मालकाचा हात तोडला

Last Updated:

Pune Crime, pune news, Pune Police, पुणे बातम्या, पुणे पोलीस, तरुणांवर जीवघेणा हल्ला

पुण्यात दोघांवर रक्तरंजित हल्ला
पुण्यात दोघांवर रक्तरंजित हल्ला
वैभव सोनवणे, प्रतिनिधी, पुणे : पुणे शहरातील महर्षी नगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून भीषण हल्ल्याची घटना समोर आली आहे. हातगाडी लावण्याच्या वादातून दोन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
महर्षी नगर परिसरात हातगाडी लावण्याच्या कारणावरून स्थानिक हॉटेल मालक आणि काही तरुणांमध्ये वाद झाला. आधी केवळ बाचाबाची सुरू होती. मात्र, काही वेळातच हा वाद चिघळला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी संतापाच्या भरात धारदार शस्त्राने हॉटेल मालकावर आणि त्याच्या कामगारावर हल्ला केला.

दोघांवर हल्ला, हॉटेल मालकाचा हात तोडला

या हल्ल्यात हॉटेल मालक गंभीर जखमी झाला असून त्याचा हात तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्यासोबत असलेला कामगारही गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात किशोर राजू बनसोडे आणि प्रसाद यांच्यावर हल्ला झाला.
advertisement

आरोपी घटनास्थळावरून पसार, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्यात हातगाडीच्या वादातून रक्तरंजित हल्ला, हॉटेल मालकाचा हात तोडला
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement