GK : शहरातील उंच इमारती काचेच्या का असतात? डिझाइन म्हणून नाही तर त्यामागे आहे महत्वाची कारणं, तु्म्हाला हे माहितीय का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सर्व आधुनिक इमारतींमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या इमारतींना असलेली काच. म्हणजे सगळ्याच उंच इमारती या काचेच्याच का असतात? असा कधी प्रश्न पडला आहे?
आपण जेव्हा एखाद्या मोठ्या शहरात किंवा आयटी हब असलेल्या परिसरात जातो, तेव्हा तिथलं वातावरण आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. सिमेंटच्या जंगलात अचानक आभाळाला भिडणाऱ्या टोलेजंग इमारती दिसू लागतात. या इमारतींकडे पाहताना आपली मान अक्षरशः वर आकाशाकडे वळते. पण या सर्व आधुनिक इमारतींमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या इमारतींना असलेली काच. म्हणजे सगळ्याच उंच इमारती या काचेच्याच का असतात? असा कधी प्रश्न पडला आहे?
advertisement
पूर्वी इमारती विटा आणि सिमेंटच्या असायच्या, मग आता या आधुनिक काळातील गगनचुंबी इमारती पूर्णपणे काचेच्या का बनवल्या जातात? हा केवळ दिखावा किंवा स्टाईल आहे का? तर तसं मुळीच नाही. या चकचकीत काचेच्या भिंतींमागे इंजिनिअरिंगची काही खास कारणं आणि सुरक्षेचे अनेक पैलू दडलेले आहेत. आजच्या या लेखात आपण याच 'काचेच्या वास्तू'मागचं नेमकं रहस्य उलगडणार आहोत.
advertisement
नैसर्गिक प्रकाश आणि विजेची मोठी बचतकाचेच्या इमारती बनवण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे 'डे-लाईट हार्वेस्टिंग'. काचेच्या भिंतींमुळे सूर्यप्रकाश थेट इमारतीच्या आतपर्यंत पोहोचतो. यामुळे दिवसाच्या वेळी कार्यालयांमध्ये कृत्रिम दिवे लावण्याची गरज भासत नाही. परिणामी, विजेच्या वापरात मोठी घट होते आणि पर्यावरणाचं रक्षणही होतं.
advertisement
तापमानावर नियंत्रणअनेकांना वाटतं की काचेमुळे आतमध्ये जास्त उकाडा होत असेल, पण तसं नसतं. या इमारतींसाठी वापरली जाणारी काच ही साधी काच नसून एक विशेष प्रकारचं इन्सुलेटेड ग्लास असतं. हे काच बाहेरची अति उष्णता किंवा कडाक्याची थंडी आत येऊ देत नाही. यामुळे उन्हाळ्यात एसी (AC) आणि हिवाळ्यात हिटरचा वापर कमी करावा लागतो, ज्यामुळे पुन्हा एकदा ऊर्जेची बचत होते.
advertisement
भूकंप आणि वादळांना तोंड देण्याची क्षमताऐकायला कदाचित विचित्र वाटेल, पण काचेच्या इमारती अत्यंत मजबूत असतात. आधुनिक तंत्रज्ञानानुसार डिझाइन केलेली ही काच प्रचंड वारा, वादळ आणि अगदी भूकंपाचे धक्के सहन करू शकते. काच ही लवचिक नसल्यामुळे ती एका ठराविक दाबाखाली स्थिर राहते आणि इमारतीचं वजन कमी ठेवण्यास मदत करते, जे उंच इमारतींसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असतं.
advertisement
आगीपासून सुरक्षा आणि कमी देखभालीचा खर्चविटांच्या भिंतींच्या तुलनेत काचेच्या भिंती आगीचा प्रतिकार करण्यासाठी अधिक सक्षम असतात. आगीच्या प्रसंगी काचेमुळे धूर आणि आग पसरण्याचा वेग कमी होतो, ज्यामुळे इमारतीमधील लोकांना बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. तसेच, काचेवर धूळ आणि घाण लवकर साचत नाही. पावसाच्या पाण्यानेही काच बऱ्याच अंशी स्वच्छ होते, त्यामुळे इतर इमारतींच्या तुलनेत यांच्या रंगकामाचा किंवा देखभालीचा खर्च खूपच कमी असतो.
advertisement








