Prabhu Shelke : गंभीर आजाराशी झुंज देतोय प्रभू शेळके, हवेत पैसे; आता Bigg Boss Marathi 6 मधूनही बाहेर
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Prabhu shelke : बिग बॉस मराठी 6 मधून या आठवड्यात घराबाहेर पडणारा प्रभू शेळके, ज्याचा प्रवास सोपा नाही. त्याचं आयुष्य खूप खडतर आहे.
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून या आठवड्यात प्रभू शेळके आऊट झाला आहे. सगळ्यांना हसवणारा असा हा प्रभू जो स्वत:ला छोटा डॉन किंवा काळू डॉन म्हणवतो. आपल्या हटके स्टाईल आणि विनोदी रिल्समुळे सोशल मीडियावर तो खूप फेमस आहे. बिग बॉस मराठीमुळे त्याला आणखी प्रसिद्धी मिळाली. पण त्याचा प्रवास म्हणावा तितका सोपा नाही. त्याचं आयुष्य खूप खडतर आहे. आधीच गरीबी त्यात तो गंभीर आजाराशी झुंज देतो आहे.
advertisement
advertisement
अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या प्रभूनं सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 2.3 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत, ज्यामुळे तो या सीझनमधील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया स्टार ठरला. प्रभूच्या "मुरगी का कपुरा खायगा" या डायलॉगने आणि त्याच्या गावरान ठसक्यातील रिल्सनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
advertisement
प्रभूची इथपर्यंतची वाटचाल सोपी नाही. सूरज जेव्हा बिग बॉस मराठी 6 मध्ये आला तेव्हा त्याची स्टोरी दाखवण्यात आली. जी पाहून रितेश देशमुखही भावुक झाला होता. सतत हसतमुख असणारा प्रभू हा कित्येक वर्षे थॅलेसेमिया या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. यावर उपचारांसाठी मोठा खर्च येतो. त्याच्या उपचारांसाठी त्याच्या आईवडिलांनी वावरही विकलं.
advertisement
advertisement
प्रभूचा लहान भाऊ सूरजलाही थॅलेसेमिया आहे. लोकल18शी बोलताना सूरजने सांगितलं होतं की, "आम्ही दोघं मोबाईलवर व्हीडिओ बनवतो. लोकांना ते आवडतात. आम्हाला थॅलेसेमिया हा आजार आहे. त्यासाठी उपचारांचा खर्च जास्त आहे. एका इंजेक्शनला 25 लाख रुपये लागणार आहेत. दोघांसाठी 50 लाखांची गरज आहे" यासाठीच प्रभू बिग बॉसमध्ये गेला होता.
advertisement






