advertisement

Honeycomb Vs Grass: कूलरसाठी कोणता कूलिंग पॅड बेस्ट? घरात जास्त गार हवा कोण देतं? पाहाच 

Last Updated:

Honeycomb Vs Grass: उन्हाळ्यामध्ये कूलरहे सर्वच घरांमध्ये लावले जातात. मात्र ते वापरत असताना कूलिंग पॅड्स कोणते वापरले हे पाहणंही महत्त्वाचं ठरतं. आज आपण पाहूया की कोणते कूलिंग पॅड कूलरसाठी बेस्ट ठरतात.

मनी न्यूज
मनी न्यूज
मुंबई : तीव्र उन्हाळा सुरू झालाय. या काळात आपल्याला कूलरची अत्यंत गरज असते. कारण उष्णतेमुळे घर तापतं ते कूल करण्यासाठी आपण कूलर वापरतो. पण कूलर किती कूलिंग देईल हे त्याच्या पॅड्सवर अवलंबून असतं. कूलरमध्ये योग्य पॅड लावले असतील तर तापमान जास्त असलं तरीही थंडगार हवा मिळेल. बाजारात दोन प्रकारचे कूलिंग पॅड उपलब्ध आहेत. यामध्ये एक हनीकॉम्ब आणि दुसरं गवताचे पॅड आहेत.
हनीकॉम्ब हे आधुनिक डिझाइनचे असतात. ते मधमाशीच्या जाळ्याप्रमाणे तयार केलेले असते ज्यामुळे गार हवा देण्यासाठी ते ओळखले जातात. कप गवताचे पॅड् हे जुन्या काळापासून वापरले जाताय. त्याची किंमत कमी आहे आणि कूलिंगही चांगली देते. या दोन्ही ऑप्शनचे काही फायदे आणि नुकसान आहेत. यामुळेच पाहूया तुमच्यासाठी काय बेस्ट ठरतं.
advertisement
गवताच्या कूलिंग पॅडचे फायदे
  • गवतच्या कूलिंग पॅडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते स्वस्तात मिळतात. किंमत कमी असल्याने गरज असल्यास तुम्ही ते लवकर बदलू शकता.
  • तुमच्या परिसरातील पाण्यात जास्त मीठ असेल किंवा तुम्ही बोअरचं पाणी वापरत असाल तर हे उपयोगी ठरतात. कारण ते बदलणं सोपं आणि स्वस्त आहे.
  • गवताचे कूलिंग पॅड हे लवकर ओले होतात. तसंच पाणी लवकर शोषूण घेतात. ज्यामुळे कूलर लगेच गार हवा देण्यास सुरुवात करतं.
  • हे कुलिंग पॅड नैसर्गिक साहित्यापासून तायर केले, ज्यामुळे पर्यावरणासाठीही बेस्ट ठरतात.
advertisement
हनीकॉम्ब कूलिंग पॅडचे फायदे
  • हनीकॉम्ब कूलिंग पॅड आधुनिक टेक्नॉलॉजीने तयार केलेले असतात. हे सामान्यतः सेल्युलोज पेपरने तयार केले जातात आणि ते मधमाशीच्या जाळ्याप्रमाणे असतात.
  • हे मजबूत असतात, त्यामुळे जास्त टिकाऊ असतात. पाण्यात मीठाचे प्रमाण कमी असल्यास, ते ती ते पाच वर्षेही वापरले जाऊ शकतात.
  • या पॅटच्या डिझाइनमुळे पाणी पूर्ण पॅडमध्ये समान पसरतं, ज्यामुळे चांगली कूलिंग मिळते. यासोबतच ते दीर्घकाळ ओले राहतात. ज्यामुळे कूलरची हवा जास्त गार वाटते.
advertisement
गवताच्या कूलिंग पॅडचे दुष्परिणाम 
  • गवताचे कूलिंग पॅड जास्त टिकाऊ नाही. ते अनेकदा बदलावे लागतात.
  • या कूलिंग पॅडमध्ये धूळ आणि घाण लवकर जमा होते. एकदा घाण गेल्यावर ते स्वच्छ करणं कठीण होतं आणि योग्यप्रकारे काम करत नाही.
  • या पॅडमध्ये घाण अडकली तर ते पूर्णपणे ओले होत नाही आणि गारवाही कमी येतो.
advertisement
हनीकॉम्ब पॅडचे दुष्परिणाम
  • हनीकॉम्ब पॅडची सर्वात मोठी कमतरता त्याची किंमत आहे. हे गवताच्या पॅडच्या तुलनेत खुप महाग असतात.
  • पाण्यात मीठ जास्त असेल तर ते आत जमा होऊन त्याचे मार्ग बंद करू शकते, ज्यामुळे ते ओले होत नाहीत.
  • दीर्घकाळ वापरल्यावर दुर्गंधी येण्याची समस्याही येऊ शकते.
advertisement
कोणता ऑप्शन ठरतो बेस्ट 
  • तुम्हाला वारंवार कूलिंग पॅड बदलण्याचा त्रास नको असेल आणि जास्त पैसे देण्यास अडचण नसेल तर हनीकॉम्ब पॅड खरेदी करू शकता.
  • तुमचं बजेट मर्यादित असेल आणि कमी खर्चा गारेगार हवा हवी असेल तर पारंपारीक गवताचा पॅड बेस्ट ठरतो.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Honeycomb Vs Grass: कूलरसाठी कोणता कूलिंग पॅड बेस्ट? घरात जास्त गार हवा कोण देतं? पाहाच 
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement