शरद मोहोळ, वनराज आंदेकरच्या हत्येसाठी जिथून पिस्तूल आले तिथे पोलिसांची धाड, 'ऑपरेशन उमरती'ची Inside Story
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune Police: पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशामध्ये जात ऑपरेशन उमरती राबवले. मध्य प्रदेशातून ७ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून अनेक पिस्तूल आणि रॉ मटेरिअल जप्त केले.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : शहरातील विविध गुंड टोळ्यांना देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री करणाऱ्या मध्य प्रदेशातील उमरती गावातील कारखान्यांवर पुणे पोलिसांच्या पथकाने छापा टाकला आणि तब्बल ५० भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात असून यापैकी ७ जणांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून ८ पिस्तुले, जिवंत काडतुसे, तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त करण्यात आला असून पुणे शहरात येणारे सगळे शस्त्र याच उमरती गावातून येत असल्याचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे. उमरती मोहिमेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये बक्षीस पुणे पोलीस आयुक्तांनी जाहीर केले. ही मोहीम नक्की कशी राबवली गेली? मोहिमेसाठी कुणाकुणाची मदत झाली याची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement
गुंड शरद मोहोळ आणि वनराज आंदेकरांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल उमरतीवरूनच मागवले होते!
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र देखील याच उमरती गावातून मागवले असल्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
५० ठिकाणी सर्च ऑपरेशन, संशय येऊ नये म्हणून खाजगी गाड्या!
advertisement
पुणे पोलिसांनी ५० ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले. या मोहिमेची कुणकुण कुणाला लागू नये यासाठी पुणे पोलिसांनी खासगी गाड्या वापरल्या. ही मोहीम राबवताना अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. रात्री अकरा वाजता आम्ही संबंधित गावात पोहोचून कारवाईला सुरुवात केली. पहाटे चार वाजता संपूर्ण गावाला वेढा घातला. मध्य प्रदेश आणि जळगाव पोलिसांचे आम्ही खूप सहकार्य लाभल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले. कारवाईत ३६ जणांना ताब्यात घेण्यात असून ५० भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. त्यांच्याकडून २१ पिस्तुले, काडतुसे, तसेच पिस्तुले तयार करण्यासाठी लागणारा मोठा साठा जप्त करण्यात आला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 23, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शरद मोहोळ, वनराज आंदेकरच्या हत्येसाठी जिथून पिस्तूल आले तिथे पोलिसांची धाड, 'ऑपरेशन उमरती'ची Inside Story


