MNS On BMC Mayor : मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, बीएमसीमध्ये KDMC पॅटर्न? मनसे नेत्याचं सूचक वक्तव्य
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
BMC Mayor: मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या आरक्षणाची सोडत निघत असताना दुसरीकडे मनसे नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई: मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या आरक्षणाची सोडत निघत असताना दुसरीकडे मनसे नेत्याच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महापालिकेतही कल्याण-डोंबिवलीसारखा पॅटर्न लागू होण्याबाबतचे संकेत दिसू लागले आहेत.
मनसेचे सहा ही नगरसेवक गटनोंदणीसाठी कोकण भवनच्या दिशेने रवाना झाला. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, योगेश सावंत, शिरीष सावंत हे सगळेच त्यांच्या बरोबर एकाच बस मधून रवाना झाले आहे. त्याआधी बाळा नांदगावकर यांनी मुंबईतील राजकीय घडामोडींबाबत भाष्य केले.
बाळा नांदगावकर यांनी काय म्हटले?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राजकारणात काहीही घडू शकतं असे वक्तव्य केले आहे. जे कल्याण डोंबिवलीमध्ये घडलं, ते मुंबईत घडेल का, यावर आता भाष्य करता येणार नसल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटले. मुंबईत मराठी महापौर होत असेल तर राज ठाकरे त्यांच्या बाबत सकारात्मक भूमिका घेऊ शकतील, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले. मुंबईत काहीही घडू शकतं असेही त्यांनी म्हटले.
advertisement
कल्याण-डोंबिवलीत मोठी घडामोड....
कल्याण-डोंबिवली महापालिकेत बुधवारी मोठी घडामोड झाली. मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला. शिंदे गटाने मनसे आणि ठाकरेंच्या बंडखोरासह महापौरपदावर दावा केला. शिंदे गट-मनसेच्या या खेळीने युतीमधील भाजपचा गेम झाल्याची चर्चा आहे. भाजपने कल्याण-डोंबिवली महापालिकेत ५० जागा जिंकल्या आहेत. तर, शिंदे गटाने ५३ जागांवर विजय मिळवला. मनसेच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटाने भाजपकडून महापौर पदावर होणारा संभाव्य दावाच संपवून टाकल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
मनसेचे मुंबईतील उमदवार विजयी
1 सुरेखा भास्कर परब - प्रभाग 38
2 साई शिर्के - प्रभाग 128
3 विद्या आर्या - प्रभाग 74
4 सुप्रिया दळवी - प्रभाग 205
5 ज्योती राजबोग - प्रभाग 115
6 यशवंत किल्लेदार - प्रभाग 192
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 11:30 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
MNS On BMC Mayor : मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, बीएमसीमध्ये KDMC पॅटर्न? मनसे नेत्याचं सूचक वक्तव्य









