Meenatai Thackeray : मीनाताईंच्या पुतळ्याची राज ठाकरेंकडून पाहणी, पोलिसांना अल्टिमेटम, ‘आरोपीला...’
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Raj Thackeray visit Meenatai Thackeray Statue: हा प्रकार समोर आल्यानंतर तात्काळ शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली.
मुंबई: दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाजवळील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. हा प्रकार समोर आल्यानंतर तात्काळ शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली.
छत्रपती शिवाजी पार्क मैदानाच्या जवळ मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे. आज सकाळी 7.30 ते 8 वाजण्याच्या सुमारास पुतळ्याच्या विटंबना करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग उडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पुतळ्याच्या आजूबाजूला लाल रंग उडाला असल्याचे दिसून आले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी पुतळा स्वच्छ करण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक आमदार महेश सावंत यांनी सांगितले की, पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सगळं व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळ 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.
advertisement
> राज ठाकरेंकडून पाहणी, पोलिसांना इशारा...
मीनाताई ठाकरे यांचा पुतळा हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानापासून जवळ आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते नितीन सरदेसाईदेखील होते.
राज ठाकरे यांनी यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि पोलिसांकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर राज यांनी आरोपीला 24 तासात अटक करावी असा अल्टिमेटमच दिला. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील राज ठाकरे यांना सगळी माहिती दिली. त्यानंतर राज यांनी पुतळ्याची पाहणी करत सगळं स्वच्छ केलंय ना, याची माहिती घेतली.
advertisement
> मीनाताई ठाकरे कोण आहेत?
दिवंगत मीनाताई ठाकरे या शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी होत. शिवसैनिक त्यांना माँसाहेब असे संबोधत असे. मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकाची विचारपूस करणे, त्यांच्या जेवणाची व्यवस्था मीनाताई करत असे. शिवसैनिक आणि त्यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ पुतळा उभारण्यात आला. त्यांच्या जयंती आणि स्मृतीदिनी शिवसैनिक अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमतात.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Meenatai Thackeray : मीनाताईंच्या पुतळ्याची राज ठाकरेंकडून पाहणी, पोलिसांना अल्टिमेटम, ‘आरोपीला...’