Ramdas Kadam : बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर हाताचे ठसे घेतले, रामदास कदमांचा ठाकरेंवर खळबळजनक आरोप

Last Updated:

बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

Ramdas Kadam big Allegation on  Uddhav Thackeray
Ramdas Kadam big Allegation on Uddhav Thackeray
Ramdas Kadam big Allegation on Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर दोन दिवस त्यांचा मृतदेह तसाच ठेवला होता.तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचेही ठसे घेण्यात आले होते. हे ठसे नेमके कशासाठी घेण्यात आले होते? असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.रामदास कदम गोरेगावच्या नेस्को पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलत होते. यावेळी रामदास कदमांच्या आरोपाने खळबळ माजली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्को पार्कमध्ये दसरा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यातून बोलताना रामदास कदम म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच निधन कधी झालं?त्याची बॉडी किती दिवस मातोश्रीवर होती? काढा माहिती, हे मी जबाबदारीने बोलतोय,असे राम कदम म्हणाले.
दोन दिवस बाळासाहेबांची बॉडी का ठेवली उद्धव ठाकरे यांनी, तुमचं अंतर्गत काय चाललं होतं? आठ दिवस मी मातोश्रीच्या बाकडावर झोपलो होतो.सगळं कळत होतं. बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते.हे ठसे कशासाठी घेतले होते? असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी केला. बाळासाहेबांच मृत्यूपत्र कुणी केलं?कधी झालं? कुणाच्या सह्या होत्या? काढा सगळ्यांची माहिती. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार घेणाऱ्या डॉक्टरांनाही विचारा, असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.
advertisement
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा हव्यास होता.त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजलि दिली होती.त्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाशी बांधली,अशी टीका देखील रामदास कदम यांनी केली.आज हे राज ठाकरे यांच्याकडे भीकेचा लोटा घेऊन जात आहेत,आता एक काय 10 भाऊ आले तरी काय नाही,असेही रामदास कदम म्हणाले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ramdas Kadam : बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर हाताचे ठसे घेतले, रामदास कदमांचा ठाकरेंवर खळबळजनक आरोप
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement