Raosaheb Danve : दानवेंनी लाथ मारल्याचा आरोप, 'त्या' कार्यकर्त्याने व्हायरल Video मागचं सत्यच सांगितलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
रावसाहेब दानवे यांनी ज्या कार्यकर्त्याला लाथ मारली होती, त्या कार्यकर्त्यांचे नाव शेख अहेमद असं आहे.शेख अहेमद हे रावसाहेब दानवे यांचे जूने मित्र आहेत.
Raosaheb Danve Viral Video : जालना : माजी मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्यात दिलजमाई झाली आहे. या दरम्यान दोन्ही नेत्यांनी एकत्र फोटो काढला होता.या फोटो दरम्यान एक कार्यकर्ता दानवेंच्या शेजारीच उभा होता. त्यामुळे फोटोत हा कार्यकर्ता येऊ नये यासाठी दानवेंनी त्याला बाजूला करण्यासाठी लाथ मारल्याचा आरोप होतोय. या संदर्भातला व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तसेच विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत दानवे, भाजपवर टीका केली आहे.या टीकेनंतर दानवेंनी लाथ मारलेल्या कार्यकर्त्यांने या घटनेमागचं संपूर्ण सत्य सांगितलं आहे.
खरं तर अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे या दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती. या भेटीनंतर दानवे आणि खोतकर यांनी फोटोसेशन केले होते. हे फोटोसेशन सूरू असताना एक कार्यकर्ता आडवा आला होता. या कार्यकर्त्याला दुर करण्यासाठी दानवे यांनी लाथेने बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता. हाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून आता विरोधकांनी दानवे आणि भाजपवर टीका करायला सूरूवात केली आहे.
advertisement
या घटनेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका सभेत दानवेंचा हा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता त्यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा वसा दिलाय.असे व्हिडिओ पाहिल्यानंतर वाटतं की,भाजपने तयार केलेले हे लोक अशा पद्धतीने वागतात. 20 तारखेला मतदानाला जाताना हा व्हिडिओ लक्षात ठेवा,असे आवाहन अंधारे यांनी मतदारांना केले आहे.
advertisement
व्हायरल व्हिडिओवर कार्यकर्ता काय म्हणाला?
view commentsरावसाहेब दानवे यांनी ज्या कार्यकर्त्याला लाथ मारली होती, त्या कार्यकर्त्यांचे नाव शेख अहेमद असं आहे.शेख अहेमद हे रावसाहेब दानवे यांचे जूने मित्र आहेत. दरम्यान व्हायरल व्हिडिओच्या घटनेवर शेख अहेमद म्हणाले की, मी दानवेंचा तीस वर्षापासून मित्र आहे. खोतकर दानवेंना भेटायला आले होते. यावेळी फोटोसेशन करताना दानवेंचं शर्ट अडकलं होतं.. ते काढण्यासाठी मी पुढे गेलो होतो.पण दानवेंच्या हातात गुलदस्ता होता. पण सोशल मीडियावर जसं म्हणतायत त्यांनी लाथ मारली, तसं काही एक घडलं नाही आहे, असे स्पष्टीकरण शेख अहेमद यांनी दिले आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
November 12, 2024 10:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raosaheb Danve : दानवेंनी लाथ मारल्याचा आरोप, 'त्या' कार्यकर्त्याने व्हायरल Video मागचं सत्यच सांगितलं?


