परतीच्या प्रवासासाठी मुंबईला निघालेला, पण आत्येभावासोबत पोहायला गेला अन्...कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
खरं तर सुजित घाणेकर हा तरूण सोमवारी मुंबईला जाणार होता. मात्र आत्येचा मुलगा आयूष चिनकटे आल्याने दोघांनीही नदीवर पोहायला जाण्याचा बेत आखला होता.
शिवाजी गोरे, रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत दोन आत्ये भावाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दापोली तालुक्यातील सडवे येथील कोडजाई नदीत हे दोन्ही आत्ये भाऊ पोहायला उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आलयाने दोघा आत्ये भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयूष अनिल चिनकटे आणि सुजित सुभाष घाणेकर अशी दोघांची नावं आहेत. या दोन्ही भावांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे.
खरं तर सुजित घाणेकर हा तरूण सोमवारी मुंबईला जाणार होता. मात्र आत्येचा मुलगा आयूष चिनकटे आल्याने दोघांनीही नदीवर पोहायला जाण्याचा बेत आखला होता. त्यानुसार गावातील एका मित्रासह आयुष आणि सुजित दापोली तालुक्यातील सडवे येथील कोडजाईनदीवर पोहायला गेले होते.सुरूवातीला तिघांनी मासे पकडले होते. मासे पकडल्यानंतर दोघा आत्ये भावांना पोहायचा मोह आवरला नाही आणि दोघेही नदीपात्रात उतरले होते.
advertisement
या दरम्यान अचानक हे दोघे भाऊ नदीत बुडू लागले होते.हे दृष्य पाहून त्यांच्यासोबत असलेल्या एका तरूणाने आरडाओरड करण्यास सुरूवात केली होती. त्याची ही आरडाओरड पाहून घटनास्थळी अनेक ग्रामस्थांनी धाव घेत या मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनाही वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले नाही.त्यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने दोन आत्ये भावांचा नदीत बुडून मृत्यू झाला. आज या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
advertisement
दरम्यान आयुष हा मुलगा अतिशय हुशार होता. त्याला शिक्षण घेऊन खूप मोठे व्हायचे होते. पण या घटनेने त्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे. या दुदैवी घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
view commentsLocation :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
November 05, 2024 9:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परतीच्या प्रवासासाठी मुंबईला निघालेला, पण आत्येभावासोबत पोहायला गेला अन्...कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर


