advertisement

विमानात अतिरिक्त इंधन का ठेवलं? अजितदादांना मारण्यासाठी कट होता का? रोहित पवारांचा थेट सवाल

Last Updated:

व्हीएसआर आणि टीडीपीचे संबंध असल्यामुळे कंपनीला वाचवलं जात आहे. परिणामी हवाई उड्डानमंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली.

अजित पवार अपघाती निधन
अजित पवार अपघाती निधन
मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाला आता गंभीर राजकीय वळण मिळालंय. आमदार रोहित पवारांनी तिसरी पत्रकार परिषद दिल्लीत घेतली आणि काही गंभीर आरोप केले. व्हीएसआर कंपनीमागे प्रभावशाली लोकांचा हात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. तसंच नागरी उड्डयनमंत्री राममोहन नायडूंच्या राजीनाम्याचीही रोहित पवारांनी मागणी केलीय. विमानात असलेलं अतिरिक्त इंधन हा कट होता का? असा प्रश्नही रोहित पवारांनी उपस्थित केलाय.
विमान अपघातात अजित पवारांच्या झालेल्या मृत्यूचा राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला. तो अपघात होता की घातपात, अशी चर्चा राज्यभरात सुरू झाली. त्यानंतर त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदांची मालिकाच सुरू केली. दिल्लीतील पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी व्हीएसआर कंपनी आणि डीजीसीए यांच्यातील संबंधांवर भाष्य केलं. काही अधिकारी कंपनीला मदत करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला.
advertisement

काही अधिकारी कॉन्टॅक्टचा वापर करून रॅकेट चालवतायेत

डीजीसीएमध्ये बसून काही अधिकारी कॉन्टॅक्टचा वापर करून रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला. प्रभावशाली लोकांचा अपघातात हात असल्याचा आरोप करत रोहित पवारांनी केंद्रीय मंत्री राममोहन नायडूंचा राजीनामा मागितला.
अजित पवारांच्या विमान अपघातावरून संशयाचं धुकं निर्माण झालेलं असतानाच अहमदाबाद विमान अपघातात पायलटनेच इंधनाचा स्वीच बंद केल्याची माहिती मागील आठवड्यात समोर आली होती. त्यामुळे बारामती अपघाताबाबतही अशाच दिशेने तपास व्हावा, याकडे लक्ष वेधण्यात आलं होतं.
advertisement

पायलटवर कोणाचा दबाव होता का?

पायलटवर कोणाचा दबाव होता का? असा प्रश्नही उपस्थित झाला होता. अजित पवारांनी भंडारा-गोंदिया येथील राईस मिलशी संबंधित फाईलवर शेवटची सही केली होती. त्या फाईलमुळे त्यांना उशीर झाला आणि त्यानंतरच अपघात घडला, असाही दावा करण्यात आला होता. त्यातच अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला वेग आला होती. विलीनीकरणाच्या बैठका आणि अपघात यांचाही संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पुन्हा एकदा त्यांचे मुद्दे देशासमोर मांडले.
advertisement

मोदी-शाह-राहुल गांधींना पत्र लिहिणार

रोहित पवारांनी अजित पवारांचा अपघात आणि त्या अनुषंगाने असणाऱ्या शंकां संदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधींना पत्र लिहिणार असल्याचं सांगितलं आहे. एकंदरीतच अजित पवार विमान अपघात प्रकरण आता केवळ अपघातापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्यामुळे डीजीसीए आणि नागरी हवाई मंत्रालयावरील आरोपांचं उत्तर कधी दिलं जातं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागंलय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विमानात अतिरिक्त इंधन का ठेवलं? अजितदादांना मारण्यासाठी कट होता का? रोहित पवारांचा थेट सवाल
Next Article
advertisement
Shahid Afridi : पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं स्थान, Inside Video
पाकिस्तानच्या आफ्रिदीने 140 कोटी भारतीयांचं मन जिंकलं, सचिन-विराटला दिलं मानाचं
  • पाकिस्तानच्या शाहिन आफ्रीदीच्या व्हिडिओची चर्चा

  • सचिन तेंडुलकर विराटशी ठेवलं खास कनेक्शन

  • आफ्रीदीच्या त्या कृतीने भारतीय फॅन्स खुश

View All
advertisement