Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारचा निर्णय, रोहित पवारांची पहिली विकेट, होम ग्राऊंडवर धक्का

Last Updated:

Rohit Pawar : राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पहिली विकेट गेली आहे. रोहित पवार यांना होम ग्राउंडवर धक्का बसला आहे.

News18
News18
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी, अहिल्या नगर: राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची पहिली विकेट गेली आहे. रोहित पवार यांना होम ग्राउंडवर धक्का बसला आहे. कर्जत नगर पंचायतीच्या अध्यक्षा उषा राऊत यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून कर्जतमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आज पू्र्ण विराम मिळाला आहे.
कर्जत नगरपंचायतीमधील 13 नगरसेवकांनी नगरसेवकांनी उषा राऊत यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. त्या अनुषंगाने आज विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र सभेच्या आधीच उशिरा राऊत यांनी आपला राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.
कर्जत येथील नगरपंचायत मध्ये आमदार रोहित पवार यांची एक हाती सत्ता होती. त्याला सुरुंग लावण्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांना यश आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 13 नगरसेवकांपैकी 8 नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणला होता. त्या अनुषंगाने आज कर्जत येथे विशेष सभा बोलवण्यात आली होती. मात्र, विशेष सभा सुरू होण्याचे आधीच सकाळी नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून एका ओबीसी महिलेच्या विरोधात राजकारण केल्याचा आरोप राऊत यांनी केला.
advertisement

पक्षीय बलाबल किती?

कर्जत नगरपंचायत मध्ये एकूण 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी तब्बल 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला होता. या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (12), भाजप (2) आणि काँग्रेस (3) या पक्षांच्या नगरसेवकांचा पाठिंबा दिला आहे. या सर्व नगरसेवकांचं आज नगरपंचायत मध्ये विशेष सभा घेण्यात आली होती.
वरिष्ठांची बैठक करूनही कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे आम्ही विश्वास ठराव आणला असल्याचे गटनेते संतोष मेहत्रे यांनी सांगितले. उषा राऊत यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
advertisement
नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावरील अविश्वासाचा ठराव 13 नगरसेवकांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडे दाखल केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आज अविश्वास ठरावाची विशेष सभा बोलवण्यात आली होती. ती सभा सुरू होणारी नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात आल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी नितीन पाटील यांनी सांगितले.
advertisement

रोहित पवारांची विकेट, राम शिंदेंची सरशी!

हा राजीनामा केवळ स्थानिक पातळीवरील असंतोषाचा परिणाम नसून यामागे मोठा राजकीय संघर्ष असल्याचं बोललं जातं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे आमदार, सभापती राम शिंदे यांच्यातील संघर्षामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

फडणवीस सरकारचा निर्णय काय?

काही दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीत एक निर्णय मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार, नगराध्यक्षांविरोधात नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणल्यास जिल्हाधिकाऱ्यांना त्यावर कार्यवाही करण्याची मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता पहिल्यांदा सत्ता बदल हा कर्जत नगरपंचायतीमध्ये झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी फडणवीस सरकारचा निर्णय, रोहित पवारांची पहिली विकेट, होम ग्राऊंडवर धक्का
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement