Rohit Pawar : 11000 ड्रिग्री तापमान अन् ब्लॅक बॉक्स निकामी, रोहित पवारांनी सांगितलं गणित! स्फोटाचं कारणही सांगितलं
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Accident : अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम आहे, असं रोहित पवार म्हणाले. यंत्रणा धिम्या गतीने काम करत असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केला आहे.
Rohit Pawar Press Conference : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवर रोहित पवार अनेक मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यावर रोहित पवारांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली अन् आरोप केले आहेत. विमानाचा एकच नाही तर अनेक स्फोट झाले. विमानात अपेक्षापेक्षा अधिकचं इंधन होतं, हेच आग लागण्यामागचं कारण असू शकतं, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. विमानाच्या टाक्या फुल का भरल्या होत्या? असा सवाल देखील रोहित पवारांनी विचारला आहे.
अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम आहे, असं रोहित पवार म्हणाले. यंत्रणा धिम्या गतीने काम करत असल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केला आहे. 1100 ड्रिग्री तापमानाने जर एक तास जळत राहिलं तरच ब्लॅक बॉक्स निकामी होतो, असं रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. ब्लॅक बॉक्सबाबत मी शंका उपस्थित केली होती. विमानाचा 210 कोटींचा लायबिलीटी विमा होता, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.
advertisement
1100 डिग्री सेल्सियसला जर विमान असेल तर ब्लैकबॉक्सला फटका बसू शकतो. सध्या ब्लॅकबॉक्स जळला असं सांगत असतील तर ते केवळ मॅनिप्युलेशन सुरू आहे, असा आमचा आरोप आहे, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. वीएसआर कंपनीवर कारवाई का होत नाही? VSR वर कारवाई का होत नाही? रोहित सिंगच्या लग्नात अनेक मान्यवर उपस्थित होते. अपघातानंतर रोहित सिंग हा अमेरिकेला पळून गेला, असंही रोहित पवार म्हणाले.
advertisement
दरम्यान, रोहित सिंगला मयामीला पळून जाण्यासाठी मदत कोणी केली याचाही तपास व्हावा, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली. विमानाच्या पायलटला कोणी ब्लॅकमेल केलं गेलं का? केंद्रीय विमान वाहतूक मंत्री यांचा नेमकं काय संबंध आहे? सत्तेतील बरेचसे लोक हे VSR शी अत्यंत जवळीक साधणारे आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंदर्भात ब्लॅकमेल करून हे केलं गेलं का? असा सवाल देखील रोहित पवारांनी विचारला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 18, 2026 11:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rohit Pawar : 11000 ड्रिग्री तापमान अन् ब्लॅक बॉक्स निकामी, रोहित पवारांनी सांगितलं गणित! स्फोटाचं कारणही सांगितलं








