जातीय आरक्षणावर RSS ची भूमिका काय? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, जे संविधानानुसार...

Last Updated:

Mohan Bhagwat on Reservation Row: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त (१०० वर्षे) राजधानी दिल्लीमध्ये विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्याख्यानानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

मनोज जरांगे पाटील-मोहन भागवत
मनोज जरांगे पाटील-मोहन भागवत
प्रशांत लीला रामदास, प्रतिनिधी, नवी दिल्ली : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे वादळ घोंघावत असताना आरक्षणाचा तिढा कसा सोडवायचा, असा यक्ष प्रश्न राज्य सरकारसमोर असताना भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट आहे. संविधाननुसार जे आरक्षण मिळाले आहे, त्याला संघाचा पाठिंबा आहे. ही संघाची फार पूर्वीची भूमिका आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त (१०० वर्षे) राजधानी दिल्लीमध्ये विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्याख्यानानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षणप्रश्नावर सखोल भाष्य केले.

ज्यांनी हजारो वर्षे जाच सहन केला त्यांचा विचार करायला हवा

मोहन भागवत म्हणाले,आरक्षण हा संवेदनांचा विषय आहे. ज्यांनी हजारो वर्षे जाच सहन केला, ज्यांचा अस्पृश्य म्हणवल्या जाणाऱ्या कुटुंबात जन्म झाला, त्ंयांचा विचार करा. त्यानंतर आरक्षणाचा प्रस्ताव संघात पारित झाला. संविधाननुसार जे आरक्षण मिळाले आहे, त्याला संघाचा पाठिंबा आहे. ही संघाची फार पूर्वीची भूमिका आहे, असे मोहन भागवत म्हणाले.
advertisement

जातीय आरक्षणावर संघाचे मत काय?

जातीय आरक्षणाच्या प्रश्नावर संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले की, या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज आहे. दीनदयाल उपाध्यायांनी दिलेल्या दृष्टिकोनाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की जे खाली आहेत त्यांनी वर येण्यासाठी हात वर करायला हवा आणि जे वर आहेत त्यांनी त्यांचा हात धरून वर खेचायला हवे. संविधान मान्य आरक्षणाला संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे भागवत यांनी स्पष्ट केले.
advertisement

ज्या ग्रंथांत जातीबद्दल उच्च नीच भाव, त्या ग्रंथांना संघ मानणार नाही

तसेच जातीबद्दल उच्च नीच भाव ज्या ग्रंथात असेल त्या ग्रंथांना संघ मानणार नाही. नवीन स्मृतीची निर्मिती करण्याची काळाची गरज आहे, असेही मोगन भागवत यांनी स्पष्ट केले.

भाजपा-आरएसएसमध्ये मनभेद नाहीत, लक्ष्य फक्त देशहित

भाजपा आणि आरएसएस यांच्यात मतभेद असल्याच्या प्रश्नावर संघप्रमुख मोहन भागवत यांनी स्पष्ट केले की “मतभेदाचे मुद्दे काही असू शकतात, पण मनभेद अजिबात नाहीत. आमचा एकमेकांवर विश्वास आहे. भाजपा सरकारमध्ये सर्व काही आरएसएस ठरवते ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. असे होऊच शकत नाही, कारण लक्ष्य एकच आहे, आपल्या देशाचे भले, असे भागवत यांनी अधोरेखित केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जातीय आरक्षणावर RSS ची भूमिका काय? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, जे संविधानानुसार...
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement