खेवलकरांचा फोन, ३५० मुली, अश्लील Photo आणि Video, रुपाली चाकणकरांची सनसनाटी पत्रकार परिषद
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Rupali Chakankar on Pranjal Khewalkar: पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त यांना पत्रव्यवहारात करत महिला आयोगाने काही सूचना केल्या होत्या. खेवलकर प्रकरणात पत्रही पाठवले होते. पोलिसांच्या चौकशीचा अहवाल महिला आयोगाला गुरूवारी प्राप्त झाला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुणे येथील अमली पदार्थ पार्टीत अटकेत असलेले प्रांजल खेवलकर याच्या तपासात पोलिसांना धक्कादायक गोष्टी हाताला लागल्या आहेत. प्रांजल खेवलकर याच्या फोनमध्ये एक हिडन फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये मुलींचे १७७९ अश्लील व्हिडीओ आणि फोटो आहेत. मुलींसोबतचे अश्लील आणि अतिशय अश्लाघ्य फोटो आहेत, जे सांगतानाही मला संकोच वाटत आहे. खेवलकर यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरणीचे देखील अश्लील फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहे. मुलींना सिनेमात काम मिळवून देतो, असे म्हणून खेवलकर मुलींना बोलवत असे, अशी सनसनाटी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात पुणे पोलिस आयुक्त यांना पत्रव्यवहारात करत महिला आयोगाने काही सूचना केल्या होत्या. खेवलकर प्रकरणात पत्रही पाठवले होते. पोलिसांच्या चौकशीचा अहवाल महिला आयोगाला गुरूवारी प्राप्त झाला आहे. या प्रकरणात प्रांजल खेवलकर, पोपटानी यांच्यासह इतर आरोपींना ताब्यात घेतले होते. अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. त्याचवेळी खेवलकर यांच्या घरातून मोबाईल जप्त केला होता. याच मोबाईलमध्ये अनेक मुलींसोबकचे आक्षेपार्ह चॅट आणि फोटो व्हिडीओ पोलिसांना मिळाल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. पुण्यात चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेतली.
advertisement
खेवलकरांच्या फोनमध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ अश्लील फोटो
खेवलकर यांच्या हिडन फोल्डरमधून महिलांचे नग्न अर्धनग्न फोटो हाती लागले आहेत. मोबाईल फोल्डरमध्ये २५२ व्हिडिओ आणि १४९७ फोटो आहेत. यात मुलींचे नग्न फोटो आहेत. मुलींना विवस्त्र करून, नशा देऊन लैंगिक अत्याचार केल्याचे दिसते. या व्हिडीओच्या माध्यमातून मुलींना ब्लॅकमेल करण्यात आले. मोलकरणीचे देखील वाईट फोटो मोबाईलमध्ये आहेत. केवळ मुंबई, पुणे, ठाणे येथूनच नाही तर परराज्यातील मुलींना बोलवून अत्याचार केले गेले, असे तपासात समोर आल्याचे चाकणकर यांनी सांगितले.
advertisement
खेवलकर याच्या मोबाईलमध्ये सात मुलींचे नंबर आयुष नावाने सेव्ह
खेवलकर याच्या मोबाईलमध्ये सात मुलींचे नंबर आयुष नावाने सेव्ह करण्यात आले होते. आरूष नावाचा माणूस खेवलकर याला मुली सप्लाय करत होता. सिनेमात काम देतो, असे प्रथम तो सांगत असे. वैश्या व्यवसायासाठी बळजबरीने वापर करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसते, असेही चाकणकर म्हणाल्या.
advertisement
३५० पेक्षा जास्त मुलींचा वापर
या प्रकरणात ३५० पेक्षा जास्त मुलींचा वापर केला आहे असे अहवालातून समोर आले आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. तसेच मोबाईलमध्ये मिळालेल्या नग्र फोटो आणि व्हिडीओत अनेक वेळा प्रांजल खेवलकर दिसून येत आहेत, असेही चाकणकर यांनी सांगितले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 07, 2025 6:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
खेवलकरांचा फोन, ३५० मुली, अश्लील Photo आणि Video, रुपाली चाकणकरांची सनसनाटी पत्रकार परिषद


