Rupali Chakankar Rupali Thombare : रुपाली ठोंबरेंचा पत्ता कट, राष्ट्रवादीच्या नव्या जबाबदारीतून डावललं, चाकणकरांना पुन्हा संधी
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Rupali Chakankar Vs Rupali Thombare :रुपाली ठोंबरे यांना पक्ष प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नव्या जबाबदारीतून डावलण्यात आले आहे. तर, दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना संधी देण्यात आली आहे.
मुंबई: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरोधात भूमिका घेणाऱ्या रुपाली ठोंबरे यांना पुन्हा एकदा पक्षाने धक्का दिला आहे . फायरब्रँड असणाऱ्या रुपाली ठोंबरे यांना पक्ष प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नव्या जबाबदारीतून डावलण्यात आले आहे. तर, दुसरीकडे रुपाली चाकणकर यांना संधी देण्यात आली आहे.
गामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी ही यादी जाहीर केली असून, या यादीत रुपाली ठोंबरे यांना स्थान न दिल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याऐवजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
advertisement
राष्ट्रवादीत आलबेल नाही?
या नव्या स्टार प्रचारकांच्या यादीत रुपाली ठोंबरेंचा पत्ता कट झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटात सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच रुपाली ठोंबरे, अमोल मिटकरी यांच्याकडून पक्ष प्रवक्तेपदाची जबाबदारी काढण्यात आली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे यांना पक्षातून सूचक संदेश दिल्याची चर्चा सुरू होती. मिटकरी यांना पक्षाकडून स्टार प्रचारकाच्या यादीत स्थान मिळाले आहे. रुपाली ठोंबरे यांना दुसऱ्यांदा डावलण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
स्टार प्रचारकांच्या यादीत कोणाला स्थान?
तटकरे यांनी जाहीर केलेल्या यादीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, तसेच मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
advertisement
यादीत नवाब मलिक, धर्मराव आत्राम, अनिल पाटील, संजय बनसोडे, प्रताप पाटील-चिखलीकर, अमोल मिटकरी, सना मलिक-शेख, समीर भुजबळ, इद्रीस नायकवडी, झिशान सिद्दीकी, राजेंद्र जैन, सिद्धार्थ कांबळे, सुरज चव्हाण, कल्याण आखाडे, सुनिल मगरे, नाझेर काझी, महेश शिंदे, राजलक्ष्मी भोसले, सुरेखा ठाकरे, नजीब मुल्ला, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर यांचाही समावेश करण्यात आला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 13, 2025 1:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Rupali Chakankar Rupali Thombare : रुपाली ठोंबरेंचा पत्ता कट, राष्ट्रवादीच्या नव्या जबाबदारीतून डावललं, चाकणकरांना पुन्हा संधी


