Crime News : वृद्धाच्या गळ्यातली सोन्याची चैन पाहून मन फिरलं, सलून चालकाने दुकानात रक्ताचा सडा पाडला,मिरा भाईंदर हादरलं

Last Updated:

वृद्धाच्या गळ्यातली सोन्याची चैन पाहून सलून चालकाचा मनात लालच आली.आणि यापोटी त्याने दुकानातच वृद्धाच खून केला.या खुनानंतर त्याने एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावली.

 Mira Bhayandar
Mira Bhayandar
Crime News : विजय देसाई, मिरा भाईंदर : मिरा भाईंदरमधून हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत वृद्धाच्या गळ्यातली सोन्याची चैन पाहून सलून चालकाचा मनात लालच आली.आणि यापोटी त्याने दुकानातच वृद्धाच खून केला.या खुनानंतर त्याने एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे मृतदेहाची विल्हेवाट लावली.पण त्याला त्याची एक चुक महागात पडली आणि हत्येचा उलगडा झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबरला विठ्ठल बाबुराव तांबे हे वृद्ध अचानक बेपत्ता झाले होते.त्यामुळे मुलगा समीर तांबे याने काशिमिरा पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी विठ्ठल तांबे यांचा शोध सूरू केला होता. या दरम्यान आजूबाजूचे सीसीटीव्ही तपासले जात असताना एका फुटेजमध्ये दुपारच्या सुमारास विठ्ठल तांबे सागर सलूनमध्ये जाताना दिसले.त्यानंतर ते सलूनमधून बाहेर आलेच नाही.पण त्यानंतरच्या फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली स्पष्ट दिसल्या. सलूनमधून रात्री उशिरा एक इसम दुसऱ्याला फरफटत बाहेर नेताना कॅमेऱ्यात कैद झाला होता.त्यामुळे पोलिसांना सलून चालकावर संशय बळावला होता.यावेळी सलून चालकाला ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
advertisement
त्यानंतर पुन्हा पोलीसी इंगा दाखवताच सलून चालकाने हत्येची कबुली दिली. एक वृध्द व्यक्ती सलूनमध्ये टॉयलेट कुठे आहे? असे विचारत शॉपमध्ये आला व बराच वेळ तेथे बसुन होता.यावेळी त्याच्या गळ्यातली चैन पाहून मनात लालच आलं.सोन्याच्या चेनसाठी त्याने टॉवेलने गळा आवळून विठ्ठल तांबे यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह दुकानातच लपवून ठेवला होता. यानंतर रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही येत-जात नसल्याची खात्री करुन प्रेत सलून जवळील गाळा नंबर-०१/०२, बारक्या लॉकवाला या दुकानसमोरील गटाराचे झाकण उघडून त्यामध्ये प्रेत टाकून पुरावा नाहीसा केला" असे त्याने सांगितले.
advertisement
दरम्यान आज काशिमीरा पोलीस ठाण्यात गुरनं ४०६/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०३, २३८, ३०९ (६) प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी अशफाक इशाक शेखला अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडून सोन्याची चेनही हस्तगत करण्यात आली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Crime News : वृद्धाच्या गळ्यातली सोन्याची चैन पाहून मन फिरलं, सलून चालकाने दुकानात रक्ताचा सडा पाडला,मिरा भाईंदर हादरलं
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement