Nanded News : पोलीस असल्याची बतावणी करत ट्रेनमध्ये शिरला,नंतर प्रवाशांसोबत...नांदेड पनवेल एक्सप्रेसमधील भयंकर घटना
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिस असल्याची बतावणी करून नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये शिरून प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला पोलिसाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Nanded News: नांदेडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पोलिस असल्याची बतावणी करून नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये शिरून प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला पोलिसाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. खरं तर हा पोलीस असल्याचे भासवत प्रवाशांची लुट करत होता. हा प्रकार प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी टीसी यांनी आरपीएफच्या मदतीने तोतया पोलिसाला पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेत एक्सप्रेसमध्ये एक तोतया पोलीस चढला होता. हा पोलीस प्रवाशांना पोलीस असल्याची बतावणी करत बॅगा तपासत होता. या दरम्यान एका प्रवाशाची बॅग चेक करताना त्यातून त्या तोतयाने काही महत्त्वाची कागदपत्रे आणि शंभर रुपये काढून घेतले. त्यामुळे हा पोलीस नसून चोर असल्याचे लक्षात येताच सहप्रवाशांनी त्याला पकडून बाजूच्या एसी डब्यातील टीसीच्या ताब्यात दिले.
advertisement
त्यानंतर टीसी यांनी आरपीएफच्या मदतीने पनवेल रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.रेल्वे पोलिसांनी प्रवाशांनी लेखी तक्रार न दिल्याने त्याला समज देऊन सोडून दिलं आहे. पण या घटनेने प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
नांदेडमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत गावातील एका घरात चोरीची घटना घडली होती.या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांना बोलावण्याऐवजी थेट मांत्रिकाला बोलावल्याचा धक्कादायक प्रकार घडला.पुढील याहून भयंकर घडलं म्हणजे मांत्रिकाने गावात येऊन चोरांसोबत अघोरी कृत्य केले होते.हे कृत्य पाहून अख्ख गाव हादरलं आहे. या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलिसांनी या प्रकरणात जादूटोना कायद्यान्वये 4 जणांवर गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सूरू केला आहे.
advertisement
चोरीच्या घटनेचा मांत्रिकाकडून तपास
नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील केरुर गावातील रामा आरोटे यांच्या घरी गेल्या 19 जुलैला चोरीची घटना घडली होती. या घटनेची तक्रार आरोटे यांनी पोलिस ठाण्यात देण्याऐवजी थेट मांत्रिकाला बोलावले होते. आरोटे यांनी 11 ऑगस्टला धर्माबाद तालुक्यातील जारीकोट येथिल गंगाराम कादरी या मांत्रिकाला गावात बोलावून घेतले होते. गावात आल्यानंतर ज्या व्यक्तींवर चोरीचा संशय होता. त्यातील परमेश्वर राठोडसह इतर 5 अशा एकूण 6 जणांना हनुमान मंदिरासमोर नेण्यात आले होते.
advertisement
संशयित आरोपी मंदिरासमोर आल्यानंतर मांत्रिकाने सर्व गावकऱ्यांसमोर अद्धश्रद्धेचा बाजार मांडला.गावातील हनुमान मंदिरासमोर लिंबू, मिरची, नारळ ठेवून भोंदू बाबा गंगाराम कादरी याने त्याचा खेळ सुरु केला. ज्यांच्यावर चोरीचा संशय होता अशा सहा जणांना पाण्याच्या हौदात बुडवण्यात आले. त्यानंतर त्यांना तांदूळ टाकून मंतरलेला पानाचा विडा खायला लावला.
दरम्यान ही घटना पोलीस पाटलाने पाहताच त्याला विरोध केला.तरीही प्रकार सुरु असल्याने पोलीस पाटील वानोळे यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यानंतर हा व्हिडिओ पोलिसांना देण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणात जादूटोना कायद्यान्वये 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
September 19, 2025 11:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nanded News : पोलीस असल्याची बतावणी करत ट्रेनमध्ये शिरला,नंतर प्रवाशांसोबत...नांदेड पनवेल एक्सप्रेसमधील भयंकर घटना