'जिद्द होती म्हणून दावलय करून', सांगलीच्या पठ्ठ्याचा नादखुळा, सगळ्या विषयात 35 मार्क्स

Last Updated:

Student Got 35 Marks in All Subject: सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील रहिवासी असणाऱ्या एका विद्यार्थ्याला ३५ टक्के गुण मिळाले आहेत.

News18
News18
HSC Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (MSBSHSE) घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एकूण 15,05,037 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली. खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या 36,133 विद्यार्थ्यांनी देखील ही परीक्षा दिली. यातील 35 हजार 697 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी सर्वत्र जल्लोष केला. पेढे वाटले.
पण महाराष्ट्रात सध्या सगळ्यात जास्त चर्चा आहे, ती सांगलीच्या पठ्ठ्याची. याचं कारण म्हणजे सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील रहिवासी असणाऱ्या एका विद्यार्थ्याला ३५ टक्के गुण मिळाले आहेत. त्याने प्रत्येक विषयात ३५ मार्क पाडत हा विक्रम केला आहे. सगळ्यात विषयात काठावर पास झाल्याने या विद्यार्थ्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे.
हेमंत किरण सटाले असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. तो सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील कौठुळी गावातील रहिवासी आहे. यंदा त्याने कोल्हापूर विभागातून बारावीची परीक्षा दिली होती. त्याने बारावीच्या परीक्षेत सर्व विषयात 35 गुण पाडलेत. 12 वीचा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या टेक्नॉलॉजी या विभागात त्याचा प्रवेश होता. तो आटपाडी तालुक्यातील दिघंचीमधील इंद्रभाग्य पद्मिनी कॉलेज मध्ये शिकत होता.
advertisement
हेमंतला इंग्रजी, मराठी, इंजिनिअरिंग ड्रॉईंग, वर्कशॉप सायन्स अँड कॅल्क्युलेशन्स, ट्रेड थेअरी आणि रोजगार कौशल्य असे एकूण सहा विषय अभ्यासाला होते. या सहाही विषयात हेमंतने काटावर पास होत, म्हणजे ३५ गुण मिळवत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याला एकूण ६०० गुणांपैकी २१० गुण मिळाले आहेत. हेमंतची मार्कशीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'जिद्द होती म्हणून दावलय करून', सांगलीच्या पठ्ठ्याचा नादखुळा, सगळ्या विषयात 35 मार्क्स
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement