Sangli Firing : ठाकरे गट शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न; सांगली हादरली, घटनेचा Live video
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला.
सांगली, असिफ मुरसल, प्रतिनिधी : सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ऐनवेळी रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. मात्र हल्लेखोराकडे असलेली रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळीच उडाली नाही. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला आहे. ही संपूर्ण घटना मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
कवठेमहांकाळ येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचा पुतण्या अभिजित पाटील यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबाराचा प्रयत्न केला. मात्र रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. रात्री कवठेमहांकाळ शहरातील एका मोबाइल शॉपीमध्ये हा प्रकार घडला आहे.मात्र या घटनेची शनिवारी रात्री उशिरापर्यंत येथील पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली नव्हती.
advertisement
सांगलीमधून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे . pic.twitter.com/Dbozwp8I6F
— News18Lokmat (@News18lokmat) August 11, 2024
अभिजित हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिनकर पाटील यांचे बंधू युवराज पाटील यांचे पुत्र आहेत. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते तहसील कार्यालयासमोरील एका मोबाइल दुकानात आले होते. यावेळी एका अज्ञाताने दुकानात प्रवेश करीत रिव्हॉल्व्हरमधून त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. पण रिव्हॉल्व्हर लॉक झाल्याने गोळी उडाली नाही. यामुळे अभिजित थोडक्यात बचावले आहेत. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
August 11, 2024 10:35 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Firing : ठाकरे गट शिवसेना नेत्याच्या पुतण्यावर गोळीबाराचा प्रयत्न; सांगली हादरली, घटनेचा Live video