Sangli : साहेब पाणी द्या! शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्यांचे पाय, VIDEO VIRAL
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
सांगलीत जत तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांना अधिकाऱ्यांच्या पाया पडण्याची वेळ आलीय. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून दुष्काळग्रस्तांना अश्रू अनावर झाले.
असिफ मुरसल, सांगली, 25 ऑगस्ट : राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली आहे. अनेक ठिकाणी धरणांच्या पाणीसाठ्यातही घट झाल्याचं चित्र आहे. दरम्यान, पाणी टंचाईचे संकट काही भागात निर्माण झालं आहे. दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे नागरिकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. सांगलीत जत तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांना अधिकाऱ्यांच्या पाया पडण्याची वेळ आलीय. याचा व्हिडीओ सध्या समोर आला असून दुष्काळग्रस्तांना अश्रू अनावर झाले.
सांगलीतील जतमधल्या मायथळ या ठिकाणी म्हैसाळ सिंचन योजनेच्या कालव्यातुन चर खुदाईचे काम वन विभागाकडून बंद पाडण्यात आले. यानंतर दुष्काळग्रस्तांना अश्रू अनावर झाले. चर खुदाईसाठी परवानगी द्यावी यासाठी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांच्या अक्षरशः पाया पडावे लागले. मात्र वन विभागाची सदर जागा असल्याने परवानगी विना खुदाई करण्यास मनाई असल्याचा स्पष्टीकरण देत वनविभागाने खुदाई बंद पाडली आहे.
advertisement
Sangli : साहेब पाणी द्या! शेतकऱ्याने धरले अधिकाऱ्यांचे पाय, VIDEO VIRAL pic.twitter.com/AUIClaSXwb
— News18Lokmat (@News18lokmat) August 25, 2023
चर खुदाईसाठी शेतकऱ्यांनी मायथळ येथे ठिय्या मारला आहे. एक दिवसांपूर्वीच खासदार संजय का पाटील यांनी या चर खुदाईसाठी 12 लाखांचा निधी देखील मंजूर केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणं आहे. मात्र वन विभागाने वन हद्दीतून चर खुदाई करण्यास मनाई केल्याने दुष्काळग्रस्तांना पाण्यापासून पुन्हा वंचित राहावे लागणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 25, 2023 4:39 PM IST