Mhada Lottery : म्हाडाचं घर नको रे बाबा! भाजप आमदाराने लॉटरीत लागलेलं 7.5 कोटींचं घर केलं परत
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Mhada Lottery : म्हाडाला भरण्यासाठी पैसे नसल्याने भाजप आमदार नारायण कुचे यांनी साडेसात कोटींचं घर परत केली आहेत.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी
जालना, 25 ऑगस्ट : म्हाडाच्या मुंबई मंडळाची घरं सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याच्या तक्रारी असतानाच सोडतीतील महागडी घरं आमदारानांही परवडत नसल्याचं चित्र आहे. कारण मुंबईतल्या ताडदेवमधील साडेसात कोटींची दोन घरं जालना जिल्ह्यातल्या बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांनी परत केली आहेत. दक्षिण मुंबईच्या ताडदेवमधील 10 कोटींचे घर म्हाडाच्या लॉटरीत कुचे यांनी साडेसात कोटींमध्ये जिंकले होते.
advertisement
मुंबईच्या म्हाडाच्या 4082 घरांची म्हाडाकडून सोडत करण्यात आली. ज्यात सर्वात महागड्या म्हणजेच ताडदेवमधील साडेसात कोटी रुपये किंमतीच्या घरासाठी काही राजकीय नेत्यांनी लोकप्रतिनिधी गटासाठी राखीव गटातून अर्ज केले होते. दरम्यान, नारायण कुचे यांना मुंबईत घर घ्यायचे होते, त्यासाठी त्यांनी देखील घरासाठी पाच अर्ज दाखल केले होते. या घरासाठी त्यांनी सर्वसाधारण व लोकप्रतिनिधी गटातून अर्ज दाखल केले होते.
advertisement
विशेष म्हणजे, कुचे यांनी क्रीसेंट टॉवरमधील 7 कोटी 52 लाख 61 हजार 631 रुपये किंमतीच्या घरासाठी 2 अर्ज केले होते. दरम्यान, याची सोडत झाल्यावर आमदार नारायण कुचे यांचे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले होते. कारण त्यांना ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये दीड हजार स्क्वेअर फुटाचे साडेसात कोटींचे घर मिळाले होते. पण आता कुचे यांनी हे घर सोडले आहेत. पुरेसे कर्ज मिळत नसल्याने कुचे यांनी हे घर सोडले आहेत. विशेष म्हणजे भागवत कराड यांच्यासाठी कुचे यांनी घर सोडले असल्याची चर्चा होती. मात्र, भागवत कराडांसाठी नाही तर आर्थिक परिस्थिती कर्ज घेण्यासारखी नसल्याने घर सोडल्याची माहिती कुचे यांनी दिली आहे. तसेच मला दोन घर लागली होती, पण मी दोन्ही घरे सोडली असल्याचं कुचे म्हणाले आहेत.
advertisement
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांची लॉटरी लागणार?
ताडदेवमधील सात कोटी किमतींच्या घरांसाठीच्या स्पर्धेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड होते. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराडांसोबतच, आमदार नारायण कुचे यांच्याकडून देखील क्रिसेंट टॉवरमधील आलिशान घरासाठी अर्ज केला होता. पण कुचे यांना लॉटरी लागल्याने घरासाठी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड म्हाडाच्या प्रतिक्षा यादीत होते. पण आता आमदार कुचे यांनी घर घेण्यास नकार दिला असल्याने कराड यांची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
August 25, 2023 4:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Mhada Lottery : म्हाडाचं घर नको रे बाबा! भाजप आमदाराने लॉटरीत लागलेलं 7.5 कोटींचं घर केलं परत