Sangli Accident : वाढदिवशीच आयुष्याचा शेवट! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंब संपलं, 6 जण ठार
- Published by:Priya Lad
Last Updated:
2 वर्षांच्या चिमुकलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे कुटुंब बाहेर गेलं होतं. घरी परतताना त्यांच्यावर काळानं घाला घातला. बर्थडे गर्लसह कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला.
असिफ मुर्सल, प्रतिनिधी/सांगली : अवघ्या 2 वर्षांची राजवी... कुटुंबाने आनंदात तिचा वाढदिवस साजरा केला. लाडक्या राजवीचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी कुटुंब बाहेर गेलं होतं. पण चिमुकलीचा बर्थडे साजरा करून घरी परतताना कुटुंबावर काळानं घाला घातला. बर्थडे गर्लसह 6 जण जागीच ठार झाले आहेत. सांगलीतील ही धक्कादायक घटना आहे.
कुटुंबातील चिमुकलीचा वाढदिवस... म्हणून संपूर्ण कुटुंब ते साजरा करायला गेलं. वाढदिवस साजरा करून हे कुटुंब परतत होतं, तेव्हाच काळानं त्यांच्यावर घाला घातला. कुटुंबाच्या कारला अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने एक मुलगी बचावली पण तिला सहा मृतदेहांसोबत अख्खी रात्र काढावी लागली. सांगलीतील ही धक्कादायक घटना आहे.
राजेंद्र पाटील यांची मुलगी स्वप्नाली भोसले हिची 2 वर्षीय मुलगी राजवी हिचा वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी हे कुटुंब कोकळे इथं गेलं होतं. राजेंद्र यांच्यासोबत त्यांच्या दोन मुली, पत्नी आणि नाती होत्या. वाढदिवस साजरा करून ते घरी परतत होते. तेव्हा या कुटुंबावर काळानं घाला घातला. तेव्हा तासगाव-मणेराजुरी राज्य महामार्गावर त्यांच्या अल्टो कारला भीषण अपघात झाला आहे.
advertisement
कालव्यात पडली कार
त्यांची कार एस एस मंगल कार्यालयाजवळ ताकारी कालव्यात पडली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या गाडीचा अपघात झाला. दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक एक मुलगी जखमी झाली आहे.
मृतांमध्ये राजेंद्र पाटील (वय 60), त्यांची पत्नी सुजाता पाटील (वय 55), मुलगी प्रियांका खराडे (वय 30), नात ध्रुवा (वय 3), राजवी (वय 2), कार्तिकी (वय 1) यांचा समावेश आहे. तर राजेंद्र यांची दुसरी मुलगी स्वप्नाली भोसले (वय 30) ही जखमी झाली आहे.
advertisement
बचावलेल्या महिलेला मृतदेहासोबत काढावी लागली रात्र
अपघातात एकाच कुटुंबातील सहा जण जागीच ठार झाले आहेत. सुदैवाने या कुटुंबातील एक मुलगी बचावली. जी जखमी झाली. पण रस्त्यात कुणीही नसल्याने मदत मिळाली नाही. रात्रभर ती गाडीतच बसून होती. तिला मृतदेहासोबत गाडीतच रात्र काढण्याची वेळ तिच्यावर आली.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
May 29, 2024 11:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Sangli Accident : वाढदिवशीच आयुष्याचा शेवट! बर्थडे गर्लसह संपूर्ण कुटुंब संपलं, 6 जण ठार