विरोधी उमेदवाराच्या घराबाहेर बॉडीगार्ड रिव्हॉल्वर घेऊन उभे, अंधारेंकडून Video ट्विट, संग्राम जगताप म्हणाले...
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Ahilyanagar Mahapalika Election: विरोधी उमेदवाराने प्रचार करू नये म्हणून त्याच्या घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन संग्राम जगताप यांचे बॉडीगार्ड उभे राहत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला.
साहेबराव कोकणे, प्रतिनिधी, अहिल्यानगर : समोरील पक्षाच्या उमेदवाराने प्रचार करू नये यासाठी आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आणि बॉडीगार्ड हे त्याच्या घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे राहत असल्याचा दावा शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी करून उमेदवाराच्या आपबीतीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केला. मात्र हे आरोप संग्राम जगताप यांनी फेटाळून लावले.
अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षा रक्षकाने बंदूक दाखवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या व्हिडीओवर आमदार जगताप यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले आहेत.
संग्राम जगताप यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले
संबंधित व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आधी व्हिडीओबाबत शहानिशा करायला हवी होती. चुकीची माहिती पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जगताप यांनी केला. याचवेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही टीका केली आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार राम वाणी यांच्या जागेवर येऊन सुरक्षा रक्षकाने बंदूक दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, व्हिडीओची सत्यता आणि आरोपांची चौकशी होण्याची मागणी केली जात आहे.
प्रचारासाठी घराबाहेर पडण्यास मज्जाव करणाऱ्या आ. संग्राम जगताप यांच्या श्री सहाय्यकाने अंगरक्षकाचा व्हिडिओ निकाल शेअर केला होता.
अहिल्यानगर येथील प्रभाग क्रमांक एक मधून उभे असणारे उमेदवार राम माने यांना रिवाल्वर चा धाक दाखवत संग्राम जगताप यांच्या लोकांनी कशी दहशत निर्माण केली… pic.twitter.com/z5khSyb9nH
— SushmaTai Andhare (@andharesushama) January 6, 2026
advertisement
सुषमा अंधारे यांचा दावा काय? व्हिडीओही शेअर केला
प्रचारासाठी उमेदवाराला घराबाहेर पडण्यास मज्जाव करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांच्या स्वीय सहाय्यकाने आणि अंगरक्षकाचा व्हिडिओ शेअर केला होता. अहिल्यानगर येथील प्रभाग क्रमांक एकमधून उभे असणारे उमेदवार राम माने यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवत संग्राम जगताप यांच्या लोकांनी दहशत निर्माण केली आहे. खुद्द उमेदवार त्याची आपबीती सांगत आहे. आमदार जगताप सोबत नसतानाही त्यांचे स्वीय सहायक आणि बॉडीगार्ड नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या समोरच्या पक्षातील उमेदवाराचा घराबाहेर रिव्हॉल्वर घेऊन उभे आहेत.
view commentsLocation :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jan 06, 2026 4:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
विरोधी उमेदवाराच्या घराबाहेर बॉडीगार्ड रिव्हॉल्वर घेऊन उभे, अंधारेंकडून Video ट्विट, संग्राम जगताप म्हणाले...










