राज्यात संतापाची लाट, अखेर शिंदेसेनेचे संजय गायकवाड नरमले, शहाणपण सुचलं

Last Updated:

संजय गायकवाड यांनी बहुभाषेचे महत्त्व सांगत छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, ताराराणी, येसूबाई आणि माँसाहेब जिजाऊ यांना अनेक भाषा येत होत्या. त्यामुळे ते लोक मूर्ख होते का? असे वादग्रस्त वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केले होते.

संजय गायकवाड (आमदार)
संजय गायकवाड (आमदार)
बुलडाणा: राज्यात मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण तापत असताना शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एकपेक्षा अधिक भाषा शिकायला छत्रपती संभाजीराजे काय मूर्ख होते काय? असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. बहुभाषेचे महत्त्व सांगताना त्यांनी महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यभरात संतापाची लाट होती. आमदार गायकवाड यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी मराठीजनांनी केली. अखेर आमदार गायकवाड यांना शहाणपण सुचले आहे.
संजय गायकवाड यांनी बहुभाषेचे महत्त्व सांगत छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, ताराराणी, येसूबाई आणि माँसाहेब जिजाऊ यांना अनेक भाषा येत होत्या. त्यामुळे ते लोक मूर्ख होते का? असे म्हणत महापुरुषांचा अपमान केला होता. त्यानंतर विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर गायकवाड यांना झोडपून काढले. अखेर प्रकरण अंगाशी आले आहे, हे लक्षात येताच संजय गायकवाड यांनी याप्रकरणी माफी मागितली आहे.
advertisement

माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, गायकवाडांचा यूटर्न

माझ्या विधानाचा गैर अर्थ काढला गेला आहे. ज्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचे संजय गायकवाड म्हणाले. मी माझे विधान मागे घेतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला, अशी कोलांटउडी संजय गायकवाड यांनी मारली.

छत्रपती संभाजीराजे यांनी १६ भाषा शिकल्या, ते मुर्ख होते का? कसला ठाकरे ब्रँड आणि त्यांचा करिश्मा?

advertisement
मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना ठाकरे बंधूंवर टीका करताना त्यांनी छत्रपती संभाजीराजे आणि शिवरायांबद्दलही अपशब्द वापरले. छत्रपती संभाजीराजे यांनी १६ भाषा शिकल्या, ते मुर्ख होते का? असा प्रश्न संजय गायकवाड यांनी विचारला. राज्यात फक्त हिंदीचा विषय नाही. जगात आज टिकायचे असेल तर तुम्हाला अनेक भाषा अवगत झाल्या पाहिजेत. हिंदीला विरोध करण्याचे कारण काय असे विचारीत जर ठाकरे ब्रँडचा करिश्मा असता तर बाळासाहेब हयात असतानाच २८८ आमदार निवडून यायला हवे होते. ते का आले नाहीत? असेही संजय गायकवाड म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज्यात संतापाची लाट, अखेर शिंदेसेनेचे संजय गायकवाड नरमले, शहाणपण सुचलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement