Satara News : महामार्गावरून प्रवास करताना सावधान! हॉटेलवर जेवायला उतरताच...डोळ्यादेखत 95 लाखांची चोरी

Last Updated:

सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बसमधून प्रवास करणारे प्रवासी हॉटेलला जेवायला उतरले होते.या दरम्यान चोरांनी चलाखीने आत शिरून 35 हजारांच्या रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसब तब्बल 95 लाखाची चोरी केल्याची घटना घडली आहे.

satara crime
satara crime
Satara Crime News: विशाल पाटील, सातारा, कराड : सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत बसमधून प्रवास करणारे प्रवासी हॉटेलला जेवायला उतरले होते.या दरम्यान चोरांनी चलाखीने आत शिरून 35 हजारांच्या रोकड आणि सोन्याच्या दागिन्यांसब तब्बल 95 लाखाची चोरी केल्याची घटना घडली आहे.या घटनेनंतर प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सूरू केली आहे.या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
कोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने एसटी बस निघाली होती. या बसमधून असंख्य प्रवासी प्रवास करत होते.या दरम्यान ही बस पुणे बंगळुरू महामार्गावर असताना साताऱ्यातील तासवडे टोल नाका परिसरात असलेल्या वराडे गावच्या हद्दीतील श्रावणी हॉटेलवर बस थांबवण्यात आली होती. प्रवाशांच्या जेवणासाठी किंला चहा नाश्त्यासाठी बस थांबली होती. या दरम्यान बसमधून सर्व प्रवासी उरतल्याचे पाहून चोरट्यांनी डाव साधला.
advertisement
एका टोळकीने मिळून बसमध्ये घुसून प्रवाशांच्या बॅगांमधील रोकड आणि दागिन्यांची चोरी केली. साधारणपणे 35 हजाराची रोकड आणि दागिन्यांसह 95 लाखांचा माल या चोरट्यांनी लांबवला होता. यानंतर सर्व प्रवाशी ज्यावेळेस आपलं नाश्ता जेवण आटपून पुन्हा बसमध्ये परतले.त्यावेळस त्यांना आपलं अस्थव्यस्थ सामान पाहून त्यांना चोरी झाल्याचा भास झाला. या दरम्यान एका संशयितावर देखील प्रवाशांना संशय आला होता. यावेळी प्रवाशांनी संशयिताला चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केले होते.
advertisement
ही घटना साताऱ्यातील तळबीड पोलीस स्टेशन हद्दीत घडली होती. या घटनेनंतर प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली.त्यासोबत संशयित आरोपीला देखील पोलिसांच्या हवाली केले होते. हा संशयित आरोपी सातारा जिल्ह्यातीलच फलटण तालुक्यातील आहे.तर अन्य 4 आरोपी फरार झाले आहेत.या आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके रवाना झालेली आहेत.या चोरीचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Satara News : महामार्गावरून प्रवास करताना सावधान! हॉटेलवर जेवायला उतरताच...डोळ्यादेखत 95 लाखांची चोरी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement