महिलेचं शीर धडापासून वेगळं, मृतदेहाशेजारी लिंबू मिरची हळद कुंकू, अंद्धश्रद्धेतून हत्या?

Last Updated:

Phaltan Women Murder: सातारा जिल्ह्यातील फलटणच्या विडणी गावात महिलेचे शीर धडापासून वेगळे केलेले आढळून आले आहे.

सातारा महिला हत्या
सातारा महिला हत्या
सातारा: फलटण तालुक्यात विडणी गावात महिलेचे शीर धडापासून वेगळे केलेले आढळून आले. मृतदेहाशेजारी लिंबू मिरची हळद कुंकू ठेवण्यात आल्याने ही हत्या अंद्धश्रद्धेतून करण्यात आल्याचा संशय बळावला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

साताऱ्याच्या फलटणमध्ये महिलेची अंद्धश्रद्धेतून हत्या?

फलटणच्या विडणी गावात ऊसाच्या शेतात महिलेचे शीर धडावेगळे करून शेजारी एका कापडावर हळदी कुंकू, काळी बाहुली आणि महिलेचे केस सापडल्यामुळे परिसरात अघोरी प्रकारातून खून केल्याची चर्चा आहे.
विडणी गावातल्या पंचवीस फाटा जवळील ऊसाच्या शेतात खून करून मृतदेह फेकून देण्यात आला आहे. या परिसरातच अज्ञात महिलेचे अवयव वेगवेगळे केलेला मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
advertisement

हल्ला झालेल्या महिलेचे नाव अद्याप कळू शकलेले नाही

हत्या झालेल्या महिलेचे अद्याप कळू शकलेले नाही तसेच कुणी हत्या केली, हे देखील कळू शकलेले नाही. तपासातून लवकरच सर्व समोर येईल, असे घटनास्थळावर आलेल्या पोलिसांनी सांगितले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महिलेचं शीर धडापासून वेगळं, मृतदेहाशेजारी लिंबू मिरची हळद कुंकू, अंद्धश्रद्धेतून हत्या?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement