गाढव स्रीशी करतोय संभोग, साताऱ्यात सापडला अजब चित्र असलेला दगड

Last Updated:

साताऱ्यातील वाईतील रविवार पेठेतील परटाचा पार येथे 13 व्या शतकातले गद्धेगळ आढळून आले आहे.

+
News18

News18

प्रतिनिधी, शुभम बोडके
सातारा : सातारा जिल्ह्यातील वाईला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. त्यात नव्याने उजेडात येत असलेले वाई परिसरातील संशोधन यामुळे वाईच्या इतिहासात नवनवीन अज्ञात असलेली पाने जोडली जात आहेत. त्यात अजून एक पान जोडले गेले. रविवार पेठेतील परटाचा पार येथे 13 व्या शतकातले गद्धेगळ आढळून आले आहे. इतिहासात या गद्धेगळचा नेमका अर्थ काय? याबद्दच साताऱ्यातील इतिहास संशोधक सौरभ जाधव यांनी माहिती दिली आहे.
advertisement
गद्धेगळचा नेमका अर्थ काय?
गद्धेगळ ही शिळा म्हणजे एकप्रकारे शापवाणी मानली जाते. वीरगळी प्रमाणेच गद्धेगळाचा उगम हा शिलाहार कालीन आहे. गद्धेगळ ही शिळा शिल्प जास्त करून शिलाहार आणि यादव यांच्या राजवटीत कोरण्यात आली आहेत. एकदा राजा जमीन दान करतो, ही जमीन कोणी बळकावून घेऊ नये आणि ही जमीन बळकावून घेतलीच तर राजाज्ञा मोडली म्हणून त्याची गय करणार नाही हे दर्शवण्यासाठी गद्धेगळ कोरले जाते.
advertisement
#RamAyenge : उत्सुकता शिगेला, अयोध्येत पोहोचली 5 किलो शुद्ध चांदीची अखंड ज्योत, अशी आहेत वैशिष्ट्ये
गद्धेगळचा दगड हा आयताकृत असून, यावर गाढव स्त्रीशी संभोग करताना दाखवलेले असते. कोणी दिलेल्या दानाचा दुरूपयोग केला किंवा नियम मोडला तर काय शिक्षा होईल हे सांगणारे हे शिळा शिल्प आहे. शिळेच्या वरच्या बाजूस सूर्य, चंद्र आणि मध्ये कलश कोरलेला असतो. ह्या सूर्य, चंद्रचा अर्थ असा होतो की जोपर्यंत ह्या सृष्टीवर चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत दान दिलेल्या राजाची कीर्ती आसमंतात कायम राहील. ते हे वरील तीन शिल्प सांगतात, असं सौरभ जाधव सांगतात.
advertisement
वाईला ऐतिहासिक वारसा स्कंदपुराणांतर्गत कृष्ण माहात्म्यात वाईचा उल्लेख वेराजक्षेत्र असा आढळतो. विराटनगर म्हणूनदेखील वाईला ओळखले जाते. किवरा ओढा काठी मिळालेले क्षुद्राष्म हत्यारे, वरवंटा, पाटा, खापरे हे निवडक अवशेष प्राचीन वस्तीच्या खुणा दर्शवते. किवरा ओढा म्हणजे आताचे रविवार पेठ येथील पूर्व बाजू. यावरून जुनी वाई ही आताचे रविवार पेठ. दुसरे म्हणजे वाई परिसरातील किल्ले आणि मंदिरे. किल्ले हे शिलाहार राजा भोज दुसरा याने बांधलेले आहेत, असं सौरभ जाधव सांगतात.
advertisement
अयोध्येत जाता येणार एकदम फ्रीमध्ये; राहण्या, खाण्याची 'अशी' आहे व्यवस्था
आमचे संशोधन कार्य गेले 6 वर्ष सुरू आहे. यामध्ये नवीन गोष्टीचे संशोधन सुरू आहे. वाई येथील मंदिरे, लेण्या, गडकिल्ले, वीरगळ, वाडे, समाधी ह्या विषयावर आपले संशोधन चालू आहे. हळूहळू अजून इतिहासाचे ज्ञात अज्ञात पाने उघडली जातील, असंही सौरभ जाधव सांगतात.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
गाढव स्रीशी करतोय संभोग, साताऱ्यात सापडला अजब चित्र असलेला दगड
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement