Pune Ganeshotsav: याची देही याची डोळा, बघा जलमय द्वारका! शनिपार मंडळाचा भव्य देखावा ठरतोय आकर्षण
- Reported by:Niranjan Sherkar
- Published by:Vrushali Kedar
Last Updated:
Pune Ganeshotsav: शहरात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळाकडून सामाजिक, पारंपरिक आणि धार्मिक देखावे साकारले जातात.
पुणे: सध्या राज्यासह पुण्यातही गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. तेजस्वी गणेश मूर्ती आणि भव्य दिव्य देखावे, हे पुण्यातील गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. शहरात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळाकडून सामाजिक, पारंपरिक आणि धार्मिक देखावे साकारले जातात. यंदा पुण्यातील शनिपार गणेश मंडळाकडून 'जलमय द्वारके'चा भव्य धार्मिक देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लोकल 18 शी बोलताना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
पुणे शहरात सध्या गणेशोत्सवामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण पाहायला मिळत आहे. शहरातील मानाच्या आणि इतर गणेश मंडळाकडून विविध प्रकारचे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक संदेश देणारे भव्य देखावे उभारण्यात आले आहेत. शहरातील स्वातंत्र्यापूर्व काळातील महत्त्वाचं मंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिपार गणेश मंडळाचं यंदा 133वं वर्ष आहे.
advertisement
यंदा शनिपार मंडळाने जलमय द्वारकेचा देखावा देखावा उभा केला आहे. देखाव्यातील मोठ्या स्क्रीन आणि आगळ्यावेगळ्या प्रकारचं डेकोरेशन नागरिकासाठी आकर्षण ठरत आहे. भगवान श्रीकृष्णाची झोपलेल्या रुपातील भव्य मूर्ती पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.
महेंद्र कुमार यांनी साकारला देखावा
मुंबई येथील आर्ट डायरेक्टर महेंद्र कुमार यांनी हा जलमय द्वारकेचा देखावा साकारला आहे. मंडळाचे कार्यकर्ते आणि महेंद्र कुमार हे मागील तीन महिन्यापासून या भव्य देखाव्याची तयारी करत आहेत. पुणे शहरात प्रथमच भव्य स्वरूपाचा धार्मिक देखावा सादर करण्यात आल्यामुळे रात्रभर येथे नागरिकांची आणि भक्तांची दर्शनासाठी आणि देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Aug 30, 2025 12:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune Ganeshotsav: याची देही याची डोळा, बघा जलमय द्वारका! शनिपार मंडळाचा भव्य देखावा ठरतोय आकर्षण









