Sharad Pawar : बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचं खास ट्विट, म्हणाले 'महाराष्ट्राच्या उद्धारासाठी...'

Last Updated:

Sharad Pawar On Balasaheb Thackeray birth anniversary : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 99 वी जयंती आहे. यानिमित्त शरद पवार यांनी पोस्ट केली आहे.

Sharad Pawar On Balasaheb Thackeray birth anniversary
Sharad Pawar On Balasaheb Thackeray birth anniversary
Maharastra politics : ठाकरी शैलीत सर्वांना आपल्या कुंचल्यातून शब्दांचे फटकारे मारणारे, रोखठोक वक्ते म्हणून आजही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतलं जातं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 99 वी जयंती आज प्रत्येक शिवसैनिक साजरी करत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा अंधेरी येथील शहाजे राजे क्रिडा संकुलात होणार आहे. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी शिवसेना शिंदे गटाने मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात “शिवोत्सव मेळावा” आयोजीत केला आहे. अशातच आता बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शरद पवार यांनी ट्विट केलं अन् आपल्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला.

काय म्हणाले शरद पवार?

प्रभावी व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी समाजातील अन्यायाविरुद्ध व्यंगचित्रांच्या माध्यमातून 'मार्मिक' भाष्य केले. कुशल संघटक व मुत्सद्दी राजकारणी असलेल्या बाळासाहेबांनी सर्वसामान्यांच्या हितासाठी लढा दिला. महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसांच्या स्वाभिमान जागृतीसाठी कायम प्रयत्नशील राहिलेले शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन, अशी पोस्ट शरद पवारांनी केली आहे.
advertisement

शिवसेना vs शिवसेना

advertisement
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना ठाकरे गटाने टीझर प्रसिद्ध केला आहे. या टिझरमध्ये आम्हीच बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक असल्याचं दाखवण्यात आलंय. तर कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाही. आम्ही जपले बाळासाहेबांचे विचार, असे बॅनर मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलात लावण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यात टिझर आणि होर्डिंग वॅार सुरू झालंय, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शरद पवारांचं खास ट्विट, म्हणाले 'महाराष्ट्राच्या उद्धारासाठी...'
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement