जिथे दहशत पसरवली, तिथेच पोलिसांनी माज मोडला, भाई-दादांवर तोंड लपवण्याची वेळ

Last Updated:

शेगाव संत नगरीत चौघे दादागिरी करीत होते. आपल्या नावाची दहशत राहावी, लोकांनी आपल्याला घाबरावे यासाठी चौघे जण सतत या ना त्या कारणाने सामान्यांना त्रास देत होते.

शेगाव आरोपींची धिंड
शेगाव आरोपींची धिंड
राहुल खंडारे, प्रतिनिधी, बुलडाणा: दहशत पसरविणाऱ्या चौघांची त्याच परिसरातून पायी धिंड काढून शेगावात पोलिसांनी आरोपींचा माज मोडला. आरोपींची धिंड बघायला बघ्यांची गर्दी झाली होती. भाईगिरी करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवर धिंड निघाल्यानंतर तोंड लपविण्याची वेळ आली होती.
शेगाव संत नगरीत चौघे दादागिरी करीत होते. आपल्या नावाची दहशत राहावी, लोकांनी आपल्याला घाबरावे यासाठी चौघे जण सतत या ना त्या कारणाने सामान्यांना त्रास देत होते. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
बुलडाणा जिल्ह्यातील संत नगरी म्हणजेच शेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत पसरवित होते. त्यामुळे संत नगरीला कलंकित व्हावे लागते होते. मात्र त्यावर उपाय म्हणून पोलिसांनी शेगावमध्ये दहशत पसरविणाऱ्या चार जणांना ताब्यात घेऊन त्यांना चांगलीच अद्दल घडावी, यासाठी चौघांची धिंड काढली. शेगाव शहरातून त्यांची धिंड काढण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जिथे दहशत पसरवली, तिथेच पोलिसांनी माज मोडला, भाई-दादांवर तोंड लपवण्याची वेळ
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement