साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा, तीन दिवसांत साडे सहा कोटींचं दान
- Published by:Prachi Amale
Last Updated:
साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश-विदेशातून सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले.
अहिल्यानगर : साईबाबांच्या शिर्डीत पार पडलेल्या तीन दिवसीय गुरुपोर्णिमा उत्सवाच्या कालावधीत भक्तांनी भरभरून दान दिलं आहे. तीन दिवसात तब्बल 6 कोटी 31 लाख रूपयांचे दान विविध माध्यमातून मंदिराला प्राप्त झाले आहे. उत्सवादरम्यान तीन लाखाहून अधिक भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले आहे.
शिर्डीच्या साईबाबा मंदिरात गुरु पौर्णिमा उत्साहात साजरी झाली असून लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. साईबाबांच्या तीनदिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवासाठी देश-विदेशातून सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. त्याचबरोबर लाखो भाविकांनी दर्शनासह साईबाबांच्या चरणी दान केले आहे. गुरूपौर्णिमा उत्सवात साईचरणी कोट्यवधींची गुरूदक्षिणा भाविकांकडून दान करण्यात येत आहे.
दानाची रक्कम -
advertisement
- दक्षिणापेटीत 1 कोटी 88 लाख 08 हजार 194 रुपये
- देणगी काऊंटरवर 1 कोटी 17 लाख 84 हजार रुपये
- सशुल्क पास देणगीतून 55 लाख 88 हजार 200 रुपये प्राप्त
- डेबिट, क्रेडिट कार्ड ,ऑनलाईन देणगी , चेक डी.डी.देणगी , मनी ऑर्डरच्या माध्यमातून 2 कोटी 5 लाख 76 हजार 626 रुपयांचे दान..
- 57 लाख 87 हजार 925 रुपये किमतीचे 668 ग्रॅम सोने...
- 5 लाख 85 हजार 879 रुपये किमतीची 800 ग्रॅम चांदी...
- एकूण 6 कोटी 31 लाख 31 हजार 362 रुपयांची देणगी...
advertisement
दरम्यान भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी आणि समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात नि:शुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
July 14, 2025 7:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा, तीन दिवसांत साडे सहा कोटींचं दान