मोठी बातमी! पहलगामनंतर महाराष्ट्राला इशारा, शिर्डीतलं साईबाबा मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
शिर्डी साईबाबा मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस तपास सुरू आहे.
हरीश दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर: पहलगाम हल्ल्यानंतर आता महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं मानलं जाणारं देवस्थान साईंची शिर्डी आहे. या शिर्डी संस्थानला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे प्रचंड खळबळ उडाली असून सध्या तिथे हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिर्डी येथील जगप्रसिद्ध साईबाबा मंदिराला अज्ञात व्यक्तीने ईमेलद्वारे बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली. ही धमकी शुक्रावारी सकाळी मिळाल्याची माहिती समोर येत आहे.
साईबाबा संस्थान आणि शिर्डी पोलीस या घटनेबाबत अधिक माहिती देण्यास टाळाटाळ करत असले तरी, धमकीच्या ईमेलमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. यापूर्वी देखील साई संस्थानला धमकीचे ईमेल आल्याच्या घटना घडल्या होत्या आणि त्यातील बहुतेक पत्रे किंवा ईमेल बनावट ठरले होते.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आधीच तणावाचे वातावरण असताना, साई संस्थानला पुन्हा धमकीचा ईमेल आल्याने एकच खळबळ माजली आहे. हा केवळ खोडसाळपणा आहे की यामागे आणखी काही गंभीर कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
साईबाबा संस्थांचे सुरक्षा अधिकारी रोहिदास माळी यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सध्या साई मंदिर आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. भाविकांमध्ये मात्र या धमकीमुळे काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 03, 2025 1:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मोठी बातमी! पहलगामनंतर महाराष्ट्राला इशारा, शिर्डीतलं साईबाबा मंदिर बॉम्बनं उडवण्याची धमकी