लेकरं रडत होती अन् शिंदे गटाच्या आमदाराचा 'शिवा' कार अडवून त्याला मारत होता VIDEO

Last Updated:

या व्हिडीओमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडीगार्ड एका व्यक्तीला भर रस्त्यावर मारहाण करत आहे.

News18
News18
मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरू झाला आहे. अशातच उद्धव ठाकरे गटाने शिंदे गटाच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकांचा संतापजनक व्हिडीओ समोर आणला आहे. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी भर रस्त्यावर एका कार चालकाला लोखंडी पाइपाने मारहाण केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा बॉडीगार्ड एका व्यक्तीला भर रस्त्यावर मारहाण करत आहे. एका होंडा सिटी कारमध्ये ही व्यक्ती बसलेली आहे. त्याची बायका मुलं सुद्धा कारमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.
महेंद्र थोरवे यांचा शिवा नावाचा हा बॉडीगार्ड एक लोखंडी पाइप घेऊन या व्यक्तीला बेदम मारहाण करत आहे. एकापाठोपाठ दोन वेळा त्याने पाइपाने या व्यक्तीला मारहाण केली आहे. हा व्हिडीओ नेरळ परिसरातला असल्याचं सांगितलं जात आहे.
advertisement
advertisement
महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही. कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल. ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढली आहे. कायदा-सुव्यवस्थेची वाट लागली आहे. कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रिपदावर बसला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे गटाने ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.
advertisement
दरम्यान, शिवा नावाच्या बॉडीगार्डने या व्यक्तीला मारहाण का केली याचे कारण अद्याप समोर आले नाही. या प्रकरणी पोलिसांमध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लेकरं रडत होती अन् शिंदे गटाच्या आमदाराचा 'शिवा' कार अडवून त्याला मारत होता VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement