Shirdi Sai Baba Sansthan: शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानाचे पाऊल, कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Shree Sai Baba Sansthan Shirdi: शिर्डीत संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर साईबाबा संस्थानाने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
शिर्डी, अहिल्यानगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांवर अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर साईबाबा संस्थानाने कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
साई संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचा मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानाने घेतला आहे. संस्थानातील कर्मचाऱ्यांची पहाटे चार वाजता ड्युटी सुरू व्हायची, ती आता सकाळी सहा वाजता सुरू होईल. शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानाने हे मोठे पाऊल पाऊल उचलले आहे.
अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार? संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात...
साई संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासूनच सुरू करण्यात येईल, अशी माहिती संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. तसेच हत्याकांडातील पीडितांच्या नातेवाईकांना संस्थानाकडून मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विमा पॉलिसीसह अन्य मदतही संस्थान मिळवून देणार असल्याचे त्यांनी आश्वस्त केले आहे.
advertisement
साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांचे नवे वेळापत्रक कसे असेल?
पहिली शिफ्ट - सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
दुसरी शिफ्ट - दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत
तिसरी शिफ्ट - रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत
जनरल शिफ्ट - सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत
शिर्डीत दुहेरी हत्याकांड
लुटीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी शिर्डी संस्थानातील दोन कर्मचाऱ्यांची धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांचा खून केला. आरोपींनी आणखी एका वयोवृद्धावर असाच हल्ला केल्याने ते देखील गंभीर जखमी आहेत. सुभाष घोडे व नितीन शेजूळ अशी मृत संस्थानातील कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सुभाष घोडे आणि नितीन पहाटे हे दोघे साई संस्थानामध्ये कामावर जात असतानाच लुटीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात आरोपींनी त्यांचा खून केला.
advertisement
तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवले, रक्कम हिसकावून घेतली, संशयावरून पोलिसांना एकाला ताब्यात घेतले
अज्ञात हल्लेखोरांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने पोलिसांनी किरण सदाफुले याला संशयावरून ताब्यात घेतले आहे.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
February 04, 2025 4:20 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Shirdi Sai Baba Sansthan: शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थानाचे पाऊल, कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा